राज्यातील धोरणावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात, पॉलिसीला लकवा झालाय…

NCP Supriya Sule : राज्य सरकारची पॉलीसी निश्चित नाही. पॉलिसीमध्ये वारंवार बदल केला जात आहे. सरकारला लकवा झाला आहे. इंडिया टुडे सी व्होटरचा सर्व्हे आमच्यासाठी खूप समाधान देणार आहे.

राज्यातील धोरणावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात, पॉलिसीला लकवा झालाय...
supriya suleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 3:40 PM

विनय जगताप, पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर घणाघात केला. शिंदे-फडणवीस-पवार या महायुतीच्या सरकारच्या धोरणाला लकवा झाला असल्याचा हल्ला त्यांनी केला. सरकारचे धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी मारक असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आज निवडणुका झाल्यास काय असणार परिस्थिती या इंडिया टुडे सी व्होटरचा या सर्व्हेवर त्यांनी मत मांडले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

राज्य सरकारची पॉलीसी निश्चित नाही. पॉलीसीमध्ये वारंवार बदल केला जात आहे. थोडक्यात राज्याच्या पॉलिसीला पॅरलेसिस झालेला आहे. महायुतीचे हे सरकार श्रेय वादात अडकले आहे. श्रेयवादात हे सरकार इतके व्यस्त झाले आहे की, त्यांना सर्व सामान्य आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास वेळ नाही. यामुळेच राज्यात कांदा, टोमॅटो यानंतर आता साखरेचा नवीन प्रश्न उभा राहिलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर हे खूप मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

निर्णय होतो तरी कुठून

सरकारचे निर्णय कोण घेत आहे, हे मला कळत नाही. दिल्लीमधून एक निर्णय होतो. परंतु तो निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना मारक ठरतो. देशात कार्पोरेट टॅक्स 25 टक्के आहे. आयकर जास्तीत जास्त 30 टक्के आहे. परंतु शेतकऱ्यांच्या कांद्यावर मात्र 40 टक्के कर लावला जात आहे. कांदा पिकवणारा शेतकरी अल्प भूधारक आहे. तो कमी पाण्यात पीक घेतो. त्या शेतकऱ्याला 40 टक्के टॅक्स लावला जात आहे. ही शेतकऱ्यांची थट्टाच आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर करा

यंदा राज्यात पुरेसा पाऊस नाही. अनेक ठिकाणी पावसाने सरासरी गाठली नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांची कर्ज सरसकट माफ करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

सर्व्हे आमच्यासाठी समाधानकारक

इंडिया टुडे सी व्होटरचा सर्व्हे आमच्यासाठी खूप समाधान देणार आहे. राज्यात आमच्या जागा वाढलेल्या दिसत आहेत. त्यापेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील. परंतु राज्य सरकार निवडणुका घेण्यास घाबरत आहेत. त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. मायबाप जनता त्यांना जागा दाखवणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.