राजा वही बनेगा, जो काबील होगा… राष्ट्रवादीच्या नानांनी शड्डू ठोकला; चिंचवड पोटनिवडणुकीत काय होणार?

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना उर्फ विठ्ठल काटे हे 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या राहुल कलाटे यांना देखील लक्ष्मण जगताप यांनी पराभूत केले होते.

राजा वही बनेगा, जो काबील होगा... राष्ट्रवादीच्या नानांनी शड्डू ठोकला; चिंचवड पोटनिवडणुकीत काय होणार?
nana kateImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 11:59 AM

चिंचवड: भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाल्याने चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनाही तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शंकर जगताप यांना तिकीट मिळाल्यास चिंचवडमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी शड्डू ठोकला आहे. सर्व अंदाज बांधूनच काटे निवडणुकीच्या कामााल लागले आहेत. त्यांचे कार्यकर्तेही कामाला लागले असून पोस्टरबाजी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना उर्फ विठ्ठल काटे हे 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या राहुल कलाटे यांना देखील लक्ष्मण जगताप यांनी पराभूत केले होते. परंतु, नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

तर जगताप यांच्या भावकीतील माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची चिन्हे आहेत. ऐनवेळी नवनाथ जगताप निवडणुकीचा अर्ज भरून या निवडणुकीची रंगत वाढवण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. त्यामुळे नवनाथ जगताप यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सूचक पोस्टरबाजी

चिंचवडची निवडणूक जाहीर होताच येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर राजकीय वॉर सुरू झालं आहे. ‘राजा का बेटा, राजा नहीं बनेगा. राजा वही बनेगा, जो काबील होगा’ अशा आशयाची सूचक आणि बालकी पोष्ट सोशल मीडियावर काटे समर्थक व्हायरल करतांना दिसत आहे. त्यामुळे काटे हे निवडणुकीत उभे राहणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

आम्ही कामाला लागलोय

मी माझी तयारी करत आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असं चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील इच्छुक उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी म्हटले आहे. आमचे कार्यकर्ते देखील तयारीला लागले आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपचाच उमेदवार निवडून येईल

काटे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छाच बोलून दाखवल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आता भाजप आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे स्थानिक राजकारणात सर्वपक्षीयांशी चांगले संबंध होते.

त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन भाजपचा आमदार निवडून येईल. पण शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असे भाजपचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.