Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या दिवशी नाव पण आमचेच अन् चर्चा पण आमचीच असणार, राष्ट्रवादीच्या नेत्याची पोस्ट व्हायरल; बंडाच्या तयारीत?

या पोस्टसोबत बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जणांसाठी राब राबतो... हे गाणं असलेला व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत बनसोडे हे मुख्यमंत्र्यांसोबत दिसत आहेत.

त्या दिवशी नाव पण आमचेच अन् चर्चा पण आमचीच असणार, राष्ट्रवादीच्या नेत्याची पोस्ट व्हायरल; बंडाच्या तयारीत?
anna bansode Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 7:57 AM

चिंचवड: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. ऐन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या फेसबुकवरील एका पोस्टने ही चर्चा रंगली आहे. बनसोडे यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ पोस्ट करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यावरून अण्णा बनसोडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत असून त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

काय आहे पोस्ट?

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना, त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार. माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे….माननीय आमदार अण्णा साहेब बनसोडे… राजकरणापलीकडची मैत्री, असं या फेसबुक पोस्टमधून म्हटलं आहे. ही पोस्ट लिहून बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे. तसेच पोस्टवर BHAI & BOSS हे दोन हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

पोस्टचा अर्थ काय?

राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उघड उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन ही पोस्ट लिहिली आहे. तसेच पोस्टमधून शिंदे गटात जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत. बनसोडे यांनी शिंदे यांना भाई संबोधलं आहे.

तसेच काही तरी नवीन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा नवीन काही तरी सुरू करू तव्हा आपलीच चर्चा होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा राष्ट्रवादीसाठी सूचक इशारा असल्याचं म्हटलं जात आहे.

anna bansode

anna bansode

किती लोक फुटणार?

बनसोडे फुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण शिंदे गटात कधी जाणार हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलं नाही. तसेच त्यांच्यासोबत कोण जाणार हेही स्पष्ट नाही. परंतु, बनसोडे यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

निवडणुकीपूर्वीच बार उडणार?

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अण्णा बनसोडे सीमोल्लंघन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसं झाल्यास पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा फटका बसमार असल्याचं सांगितलं जात आहे.

चित्रफित काय सांगते?

या पोस्टसोबत बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जणांसाठी राब राबतो… हे गाणं असलेला व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत बनसोडे हे मुख्यमंत्र्यांसोबत दिसत आहेत. थोडक्यात शिंदे यांची स्तुती करणारा हा व्हिडीओ आहे. त्यावरून बनसोडे हे राष्ट्रवादीला धक्का देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.