Rohit Pawar | रोहित पवार यांचा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मोठा निर्णय

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या उपोषणाला रोहित पवार यांनी पाठिंबा दिलाय. तसेच रोहित पवार यांनीदेखील एक मोठा निर्णय घेतला आहे.

Rohit Pawar | रोहित पवार यांचा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 10:11 PM

पुणे | 25 ऑक्टोबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी 40 दिवसांचा वेळ दिला होता. पण 40 दिवसांनंतरही सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला राज्यातील विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोहित पवार उद्या एक दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. रोहित पवार यांनी आज युवा संघर्ष यात्रेदरम्यान याबाबतची घोषणा केली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाची राज्यात युवा संघर्ष यात्रा सुरु आहे. रोहित पवार या यात्रेच्या निमित्ताने राज्यभर फिरुन सर्वसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या दरम्यान त्यांनी आज महत्त्वाची घोषणा केली.

रोहित पवार अन्नत्याग करुन 18 किमी पायी चालणार

रोहित पवार उद्या दिवसभर अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रोहित पवार एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे या दरम्यान त्यांची युवा संघर्ष यात्रा सुरूच असणार आहे. ते उद्या 18 किमी पायी चालणार आहेत. रोहित पवार उद्या अन्नत्याग करुन सणसवाडी ते पाडोळी असं 18 किमी पायी चालणार आहेत.

सोलापुरात तर गावकऱ्यांनी शपथच घेतली

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झालाय. राज्यातील हजारो गाव-खेड्यांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. पंढरपूरमध्ये खर्डी गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. गावकऱ्यांनी आगामी निवडणुकीत मदतान न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राजकीय नेत्यांना गावात फिरु देणार नाही, अशी शपथच गावकऱ्यांनी घेतली आहे.

दुसरीकडे सांगोला तालुक्यातील मेडशिंगि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर गावकऱ्यांनी बहिष्कार घातला आहे. मेडशिंगि ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीत एका जागेसाठी आठ जणांनी अर्ज भरले होते. पण गावकऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, जरांगे पाटिल यांना पाठिंबा देण्यासाठि आठ जणांनी अर्ज मागे घेवून पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.