हॅप्पी बर्थडे कुंती, तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो, रोहित पवारांच्या खास शुभेच्छा
राष्ट्रवादीचे युवा नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी त्यांच्या सहचारिणी कुंती पवार यांचाही वाढदिवस असतो. पत्नीच्या वाढदिवसाला रोहित पवार यांनी खास फेसबुक पोस्ट लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुणे : राष्ट्रवादीचे युवा नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी त्यांच्या सहचारिणी कुंती पवार यांचाही वाढदिवस असतो. पत्नीच्या वाढदिवसाला रोहित पवार यांनी खास फेसबुक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हॅप्पी बर्थडे कुंती, तुझ्यासाठी माझी ओंजळ सतत भरलेली राहो
फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून रोहित पवारांनी पत्नीचं आपल्या आयुष्यातील स्थान विषद करताना त्यांचं भरभरुन कौतुक केलंय. “कुतींला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो”, अशी प्रार्थना रोहित पवार यांनी केली आहे.
घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या जीवनसाथी सौ. कुंतीचाही माझ्यासोबतच आज वाढदिवस. यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो,ही प्रार्थना, अशा शब्दात रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित आणि कुंती पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
रोहित पवार आणि कुंती पवार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि रोहित पवार यांचे हितचिंतक त्यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत.
रोहित पवार यांची कारकीर्द
वडील राजेंद्र आणि आई सुनंदा यांच्या पोटी 29 सप्टेंबर 1985 रोजी रोहित पवार यांचा जन्म झाला. म्हणजेच आज त्यांनी आज वयाची 36 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि 37 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांना व्यवसायाकडे कल राहिला. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्यांना काही काळ व्यवसाय केला. नंतर राजकारण त्यांनी पाऊल टाकलं. पुणे जिल्हा परिषदेत त्यांनी शिर्सुफळ गटातून बाजी मारली. दोन वर्षाच्या कार्यकाळात खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जिल्हा परिषदेवर काम केलं. विधानसभा 2019 ला संधी मिळाल्यावर कर्जत जामखेडमधून भाजपचे तत्कालिन मंत्री राम शिंदे यांना पराभवाचा धक्का देऊन ते जायंट किलर ठरले. गेली 22 महिने कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी म्हणून ते काम पाहत आहेत.
कोण आहेत कुंती पवार?
कुंती या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांच्या कन्या आहेत. नॉटिंगहॅम विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयात त्यांनी पदवी संपादन केली आहे. रोहित-कुंती जोडीला दोन अपत्य आहेत. आनंदिता आणि शिवांश अशी त्यांची नावे आहेत.
रोहित पवारांचा लग्न ठरवण्यात अजितदादांची महत्त्वपूर्ण भूमिका
रोहित पवार आणि कुंती यांचं लग्न ठरवण्यात अजितदादांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, असं खुद्द रोहित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं. तसंच अजितदादांनी देखील एका कार्यक्रमात गमतीने रोहित पवारांच्या लग्नावरून सतिश मगर यांना टोले लगावले होते.
(NCP MLA Rohit Pawar Greets Wife Kunti Pawar Birthday through Facebook Post)
हे ही वाचा :