मराठा आंदोलकाचा कपडे फाडण्याचा इशारा, रोहित पवार यांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अखेर त्यांच्या युवा संघर्ष यात्रेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील हजारो गावांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींना गावात येण्साय बंधी घातली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक योगेश केदार यांनी रोहित पवार यांना त्यांची यात्रा थांबवण्याचं आवाहन केलं होतं.

मराठा आंदोलकाचा कपडे फाडण्याचा इशारा, रोहित पवार यांचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 9:05 PM

सुनिल थिगळे, Tv9 मराठी, पुणे | 27 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या नेतृत्वात निघालेल्या युवा संघर्ष यात्रेला स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा समाजाने राज्यातील हजारो गावांमध्ये नेतेमंडळींसाठी गावबंदी घातली आहे. पण तरीही रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरु असल्याने मराठा आंदोलक योगेश केदार यांनी रोहित पवार यांना यात्रा थांबवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रोहित पवारांनी आंदोलन थांबवलं नाही तर आम्ही त्यांचे कपडेसुद्धा फाडू, असा इशारा योगेश कदम यांनी दिला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन युवा संघर्ष यात्रेला स्थगिती दिली आहे. वातावरण वेगळ्या दिशेला जावू नये म्हणून आपण युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा थांबवावी. अन्यथा आम्ही जावून यात्रा थांबवणार, असा इशारा मराठा आंदोलक योगेश केदार यांनी हा दिला होता. “रोहित पवार यांनी तात्काळ यात्रा थांबवावी अन्यथा उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचे कपडे फाडायलादेखील मागेपुढे पाहणार नाही”, अशी धमकी योगेश केदार यांनी दिली होती.

योगेश केदार यांचा नेमका इशारा काय?

“आमदार रोहित पवार यांनी त्यांची यात्रा आजच्या आज थांबवावी. तुम्ही उद्या यात्रेत चालताना दिसलात तर उद्या रात्री सकल मराठा समाजाच्यावतीने तुमचे कपडेदेखील फाडायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. तुम्हाला हा शेवटचा इशारा आहे. मराठा समाजाने गावबंदी केली आहे. त्यामुळे सर्व मंत्री, आमदार, नेत्यांना गावबंदी केलेली आहे. त्यामुळे हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. त्याला रोहित पवार अपवाद असू शकत नाहीत. त्यांनी त्यांची यात्रा थांबवावी. नाहीतर त्यांना त्याची फळे नक्की भोगावे लागतील”, असा इशारा योगेश केदार यांनी दिला होता.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार यांना योगेश कदम यांच्या धमकीबाबत प्रश्न विचारला त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी स्वतः मराठा आहे. मी भूमिका स्पष्ट केली आहे. मी घाबरलो का? असं तुम्ही मला विचारत असाल तर युवा आत्महत्या करत असतील तर हो मी घाबरलो. संधी मिळत नसेल तर हो मी घाबरलो. जातीय तेढ असेल तर हो मी घाबरलो”, असं रोहित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....