BIG BREAKING | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली. प्राध्यापक नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिलीय.

BIG BREAKING | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 5:53 PM

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात प्राध्यापक नामदेव जाधव यांना काळं फासलं आहे. संबंधित प्रकार पुण्याच्या पत्रकार भवन येथे घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं. नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते, याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुण्यात काळं फासलं आहे.

“आमच्याविरोधात कारवाई व्हायची ती होऊद्या. पण माझं म्हणणं आहे, शरद पवार यांच्याविषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. ते कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे, नाही तेव्हा शरद पवारांचे पाया पडायला यायचा. शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया एका आक्रमक कार्यकर्त्याने दिली. “शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या नामदेव जाधव यांना पुण्याच्या पत्रकार भवनाजवळ काळं फासण्यात आलं आहे”, अशी प्रतिक्रिया एका महिला कार्यकर्त्याने दिली.

नेमकं काय घडलं?

नामदेव जाधव यांचा आज भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता. पण भंडारकर इन्स्टिट्यूटने ती परवानगी नाकारली. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पत्रकार भवनसमोर जमले. नामदेव जाधव बोलत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळं फासलं.

भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पर्यटनातून उद्योजकतेकडून असा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरी करण्यात यावी, या विषयावर भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी फी देखील ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमात नामदेव जाधव प्रमुख व्याख्याते असणार होते. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. ते भंडारकर इन्सिट्यूटच्या प्रवेशद्वारावरावर पोहोचले. ही बाब नामदेव जाधव यांच्या लक्षात आले. ते माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी आले. पण तेव्हाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं.

‘होय, आम्ही नामदेवराव जाधव यांना काळं फासलं’

पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या आंदोलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आम्ही आजच्या या आंदोलनाची जबादारी स्वीकारतो. होय, आम्ही नामदेवराव जाधव यांना काळं फासलं. या नामदेव जाधवांना विक्रोळी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. एका शाळेत पैसे देवून मुलांचे मार्क्स वाढल्याप्रकरणी त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. आणि आज तो शरद पवार यांच्यावर टीका करतोय”, असं प्रशांत जगताप म्हणाले.

“लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. पण तो खऱ्या पुराव्यावर करावी. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात 60 वर्षांपासून जास्त कालावधीपासून आहेत. त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जातात. हे आरोप होत असताना पुरावे सादर केले जात नव्हते. पुरावे असते तर निश्चित टीका करावी. आम्ही आठ दिवसांचा कालावधी दिला होता. आम्ही त्यांना इशारा देवूनही ती भाषा थांबवली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासवलं”, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.