शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, पालिका निवडणुकांच्या तोंडावर नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचे दिसत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.

शरद पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, पालिका निवडणुकांच्या तोंडावर नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 8:25 AM

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दोन दिवसांचा पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) दौरा करणार आहेत. शनिवारी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक होणार असून रविवारी मेळावा घेण्यात येणार आहे. खुद्द शरद पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

दोन दिवसांचा पिंपरी चिंचवड दौरा 

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचे दिसत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी आजी-माजी नगरसेवकांची बैठक, तर रविवारी कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

कसा आहे पवारांचा दौरा?

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस शहराचा दौरा करतील. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

त्यानंतर निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर, रविवारी दुपारी साडेतीन वाजता रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

पवारांसोबत दौऱ्यावर कोण कोण?

या दोन दिवसीय दौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

क्या हुआ तेरा वादा? पुण्यात राष्ट्रवादी भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार

परळीच्या मार्केट कमिटीचा राज्यभरात नावलौकिक होणार, धनंजय मुंडेंचा विश्वास

… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत दिसले असते; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.