NCP Protest : बोट दाखवेल तिथं बोटसेवा सुरू झालीच पाहिजे, महापालिका भवनासमोर खरीखुरी बोट आणत राष्ट्रवादीचं भाजपाविरोधात आंदोलन

रविवारी संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. संध्याकाळच्या वेळी दाट काळे ढग आणि त्यानंतर गडगडाट तसेच विजांचा कडकडाट होत मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली होती.

NCP Protest : बोट दाखवेल तिथं बोटसेवा सुरू झालीच पाहिजे, महापालिका भवनासमोर खरीखुरी बोट आणत राष्ट्रवादीचं भाजपाविरोधात आंदोलन
भाजपाविरोधात आंदोलन करताना पुणे राष्ट्रवादी कार्यकर्तेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 12:25 PM

पुणे : बोट (Boat) दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे, अशी मागणी करत राष्ट्रवादी पुणे शहराच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पुण्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) शहर तुंबले होते. त्यामुळे भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आज महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी खरीखुरी बोट राष्ट्रवादीने आणली होती. पुढील काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली. पुणेकरांना खड्ड्यांत घालणाऱ्या भाजपाचा निषेध असो, पुणेकरांना पाण्यात बुडवणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, भाजपाचे करायचे काय – खाली डोके वर पाय, अशाप्रकारची घोषणाबाजी राष्ट्रवादीतर्फे यावेळी करण्यात आली. खरी बोट आणून यावेळी भाजपाचा निषेध करत हे आंदोलन (NCP protest) करण्यात आले आहे.

रविवारी बसला होता तडाखा

रविवारी संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. संध्याकाळच्या वेळी दाट काळे ढग आणि त्यानंतर गडगडाट तसेच विजांचा कडकडाट होत मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली होती. या पावसानंतर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. काही ठिकाणी तर दुचाकीदेखील वाहून गेल्याचे प्रकार घडले. पाषाण, पंचवटी, स्टेट बँक नगर येथे पहाटे दोन चारचाकी वाहनांवर झाड कोसळले होते. अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत ते झाड बाजूला केले. हडपसरमधील भाजी मंडईतही पाणीच पाणी झाले होते. तर लोहगाव, धानोरी आणि इतर काही ठिकाणच्या नागरिकांच्या घरात, सोसायट्यांत पाणी शिरले होते.

राष्ट्रवादीचे आंदोलन

हे सुद्धा वाचा

आरोप प्रत्यारोप

पुण्यात पाऊस आणि त्यानंतर झालेल्या गैरसोयीनंतर राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. टेंडरची मलई खाण्यातच भाजपा गुंतले असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर आतापर्यंत राष्ट्रवादीचीच सत्ता होती, असा पलटवार भाजपाने केला. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीने चक्क महापालिका भवनासमोर खरीखुरी बोट आणत भाजपाचा निषेध केला. बोटीत राष्ट्रवादीचे पुण्यातले नेते प्रदीप देशमुख बसले होते. तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जमत आंदोलन केले.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.