BhauBeej 2023 | भाऊ-बहीण वेगवेगळ्या गटात, राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘ही’ भाऊबीज यंदा नाही होणार

BhauBeej 2023 | सध्याच्या राजकारणात पक्षीय स्तरावर फाटाफूट झाली आहे. बहीण-भाऊ वेगवेगळ्या पक्षात आहेत. वरती बातमीच शीर्षक वाचून तुमच्या डोळ्यासमोर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे चेहरे आले असतील. नाही, आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाहीय.

BhauBeej 2023 | भाऊ-बहीण वेगवेगळ्या गटात, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ही' भाऊबीज यंदा नाही होणार
Jayant Patil
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 11:36 AM

पुणे (अभिजीत पोते) : आज भाऊबीजेचा दिवस आहे. दिवाळी सणात भाऊबीजेच एक वेगळ महत्त्व आहे. रक्षा बंधनप्रमाणे भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. बहीण-भावामधील प्रेमाच, विश्वासच नात घट्ट करण्याचा आजचा दिवस आहे. सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणातही अशी काही बहीण-भावांची नाती आहेत. रक्ताची नसली, तरी आपुलकी, माया, काळजी यातून तयार झालेली ही बहीण-भावांची नाती आहेत. पंकजा मुंडे-धनंजय मुंडे ही चुलत भावंड. एकाच कुटुंबातून आलेल्या या दोघांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भाजपामधून झाली. पण आज पंकजा आणि धनंजय वेगवेगळ्या पक्षात आहेत. सध्याच्या राजकारणात पक्षीय स्तरावर फाटाफूट झाल्यामुळे बहीण-भाऊ वेगवेगळ्या पक्षात असल्याच चित्र आहे. वरती बातमीच शीर्षक वाचून तुमच्या डोळ्यासमोर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे चेहरे आले असतील. नाही, आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाहीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक बहीण-भावाच नात आहे. रूपाली चाकणकर आणि जयंत पाटील.

दरवर्षी भाऊबीजेला जयंत पाटील हे रूपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून जयंत पाटील हे रूपाली चाकणकर यांच्याकडे न चुकता भाऊबीजेसाठी जात आहेत. पण यंदा मात्र त्यात खंड पडणार आहे. सध्या जयंत पाटील आणि रूपाली चाकणकर हे वेगवेगळ्या गटात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही महिन्यांपूर्वी फूट पडली. जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर रूपाली चाकणकर या अजित पवार गटात आहेत. यंदा मात्र ही भऊबीज साजरी होणार नाहीय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट किंवा दोघांमध्ये मतभेद हे त्यामागे कारण नाहीय.

भाऊबीजीसाठी येणार नाहीत हे नक्की

यंदा जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे जयंत पाटील भाऊबीजेसाठी येणार नाहीयत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील रूपाली चाकणकर यांच्याकडे भाऊबीजेसाठी येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. कालच जयंत पाटील यांनी आपल्याला डेंग्यू झाला असून काही दिवस विश्रांतची गरज असल्याच ट्विट केलं होतं. त्यामुळे जयंत पाटील रूपाली चाकणकर यांच्याकडे भाऊबीजीसाठी येणार नाहीत हे नक्की.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.