अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवारांनी शड्डू ठोकला, त्या जागांवर…

शरद पवार गटाच्या तयारीबाबत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिले आहे. आपण कितीही चांगले काम केले तरी बिनविरोध निवडून येऊ शकत नाही.

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवारांनी शड्डू ठोकला, त्या जागांवर...
sharad pawar and ajit pawarImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Aug 02, 2024 | 9:13 AM

Maval Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबत राहणेच पसंत केले. अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार बाहेर पडले. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्या आमदारांना धडा शिकवण्याचा चंग शरद पवार यांनी बांधला आहे. पहिल्या टप्प्यात शरद पवार यांनी वीस जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या आमदारांविरुद्ध शरद पवार तरुण उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.

साहेबांनी लढ म्हटल्यावर…

शरद पवार यांनी त्या बंडखोर आमदारांविरोधात रणनिती तयार केली आहे. त्यासाठी काही जागा निवडल्या आहेत. त्यामध्ये मावळातील जागा सुद्धा हेरली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात शरद पवार गटातील राष्ट्रवादी कार्यकर्ते जोमात कामाला लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्ता पडवळ यांनी सूचक विधान केले आहे. शरद पवार साहेबांचा शब्द अंतिम असणार आहे. साहेबांनी लढ म्हटल्यावर आपण नक्कीच मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले.

जागा शरद पवार गटाला हवी

मावळ विधानसभा जागा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जात आहे. महाविकास आघाडीतही ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत, असे दत्ता पडवळ यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

निवडणुकीत रंगत वाढणार

शरद पवार गटाच्या तयारीबाबत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिले आहे. आपण कितीही चांगले काम केले तरी बिनविरोध निवडून येऊ शकत नाही. मावळ विधानसभा मतदारसंघात विविध पक्षातून अनेक इच्छुक आहेत. त्याच बरोबर किती अपक्ष उभे राहतील ते सांगता येणार नाही, असे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मावळात मोठी रंगत पहायला मिळणार यात कोणतीही शंका नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.