Jayant Patil : राष्ट्रवादीच नाव आणि चिन्ह जणार असं जयंत पाटील यांना का वाटतय?
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मराठा आरक्षणाच्या विषयावर भाष्य केलं. त्यांनी मनातली कुठली गोष्ट बोलून दाखवली?. राज्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलनचा विषय तापला आहे.
पुणे : “राज्य सरकारने केंद्राशी बोलून आरक्षणाची टक्केवारी वाढवली पाहिजे. इतर राज्यात जे झालं आहे, त्यावर सरकारने विचार करावा अंसं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. “जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडलं, तर त्यात वावग नाही, आमच नाव, चिन्ह जाईल अस वाटतंय. दुसऱ्याना ते देऊन परत शिवसेनेसारखी स्थिती निर्माण होऊ शकते” असं जयंत पाटील म्हणाले. सागर बंगल्यावरचा बॉस कधी भेटला, तर आम्ही नक्की विचारू महाराष्ट्रात असे किती सोडलेत?” असं जयंत पाटील म्हणाले. “सदाभाऊ आज काय बोलतील., उद्या काय कळत नाही. मी जाणार आहे एका लग्नात त्यांना विचारतो तुम्ही अस बोलले का?” असं जयंत पाटील म्हणाले.
“आंदोलकांवर हल्ला कोणी करायला लावला? हे शोधणारी यंत्रणा आमच्याकडे नाही. आम्हाला शंका आहे. गृहमंत्री यांना माहिती नसेल किंवा पोलीस सरकारच ऐकत नसेल तर सरकारचा अर्थ काय? नियंत्रण नसणारी फोर्स आहे. महाराष्ट्रात लाठी हल्ला कोणी केला. न्यायाधीश समिती नेमून चौकशी करा, आमची मागणी आहे. अजून उपोषण सुरू आहे” असं जयंत पाटील म्हणाले. “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना जायला काय हरकत होती? दहीहंडीला भेट देण्यापेक्षा जरंगे पाटील यांना भेटले असते तर बरं झालं असतं. त्यामुळे सरकारचा वचक राहीलेला नाही” असं जयंत पाटील म्हणाले. ….तर कुठलाही मंत्री ऐकून नाही घेणार
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज धनगर आंदोलकांनी भंडारा उधळला. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “एखाद्या मंत्र्यांवर अशा पद्धतीने काही फेकणे चुकीचे आहे, ते एका राज्याचे मंत्री आहेत. शिष्टमंडळानेही त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे होतं. असं जर होत असेल तर कुठलाही मंत्री ऐकून घ्यायला तयार होणार नाही” जयंत पाटील यांनी जगन्नाथ शेवाळे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. सरकार गोंधळलेले आहे, समित्या नेमून वेळ काढत आहे असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत, तेव्हापासून जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबत आहेत.