AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Ravikant Varpe issue Notice: पंतप्रधान मोदींची प्रतिमा भगवान विठ्ठलापेक्षा मोठी असल्याच्या दाव्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या रविकांत वरपेना पोलिसांची नोटीस ; सभास्थळी काळ्या कपड्यास मज्जाव

देहूत मोदींची सभा होणार असून या सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले आहेत. याबरोबरच कडक तपासणी करूनच वारकऱ्यांना सभेच्या ठिकाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी काळा कपडा घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

NCP Ravikant Varpe issue Notice: पंतप्रधान मोदींची प्रतिमा भगवान विठ्ठलापेक्षा मोठी असल्याच्या दाव्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या रविकांत वरपेना पोलिसांची नोटीस ; सभास्थळी काळ्या कपड्यास मज्जाव
Ravikant varpe Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 11:55 AM

पिंपरी – आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महारांजाच्या  शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  श्रीक्षेत्र देहूत उपस्थित राहणार आहेत. अवघ्या काही तासात या सोहळयाला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना देण्यात येणाऱ्या संत तुकारामाच्या पगडी वरील अंभगामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर देहू देवस्थानने (Dehu Devasthanan)पगाडीवरील अभंगाच्या ओळी बदलल्या त्यानंतर आता पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या निमित्ताने मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र भाजपकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर पंतप्रधान मोदींची प्रतिमा भगवान विठ्ठलापेक्षा मोठी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी आक्षेप घेतला असून, विठ्ठलापेक्षा नरेंद्र मोदींचा फोटो मोठा असल्याने हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

रविकांत वरपेना पोलिसांची नोटीस

रविकांत वरपे यांनी भाजपकडून लावण्यात आलेल्या फलकाचे फलकाचे फोटो ट्विट करत हे माहिती दिली होती. तसेच या प्रकरणी भाजपनं संप्रदायाची माफी मागावी असे म्हटले होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविकांत वरपे 149 अंतर्गत नोटीस बजावली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की आपणअथवा आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपणाला सर्वस्वी जबाबदार धरण्यात येऊन प्रचलित कायद्यानुसार आपल्यावर कारवाई करण्यात येईल. यामुळे कायदा व सुव्यस्थेचा कोणताही प्रश्न निर्मण होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी सारे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाने वादग्रस्त बॅनर हटवले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपकडून हे वादग्रस्त बॅनर हटवण्यात आले आहेत. पांडुरंगापेक्षा पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो लावण्यात आला होता. भाजपच्या वरिष्ठांकडून वादग्रस्त बॅनर हटवण्याचे आदेश दिले होते. चला, भाजपाने मान्य तर केले की पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा होता. पांडुरंगा भाजपला सद्बुद्धी दे असे ट्विट करत भाजपकडून नव्याने लावण्यात आलेल्या पोस्टर फोटो त्यांनी ट्विट केला आहे.

सभेच्या ठिकाणी काळया कपड्यास मज्जाव

देहूत मोदींची सभा होणार असून या सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले आहेत. याबरोबरच कडक तपासणी करूनच वारकऱ्यांना सभेच्या ठिकाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी काळा कपडा घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सभास्थळी , गेटवर काळा कपडा, मास्क काढण्यास पोलिसांकडून सांगितलं जात आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.