पोलिसांची मदत हवीय ? डायल करा 112 अन पुढच्या 7 मिनिटात पोलिसांची मदत मिळवा
तक्रारदार व्यक्तीचा सर्व तक्रारी कॉल प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पारपडते.
पुणे – सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुणे पोलीस कायमच धावून येतात. अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी मदतीसाठीचा डायल 112 योजना सुरु केली आहे. पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर 8 सप्टेंबर 2021 ला अय योजनेला सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून अडचणीच्या काळात 112 नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला 7 मिनिटामध्ये पोलिसानांची मदत मिळत आहे .
अशी घेतली जाते दखल राज्यातील नागरिकांना एकाचवेळी सर्व प्रकारची मदत मिळावी. या उद्देशाने 112 या डायल ही योजना सुरु करण्यात आली. यामध्ये तक्रारदार व्यक्तीचा सर्व तक्रारी कॉल प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पारपडते.
लोकेशन कळण्यास अडचण यापूर्वी पोलिसांना एखाद्या तक्रारदाराने 100 नंबर वर कॉल केला असता तक्रारदार यांचे लोकेशन कळत नसत. परंतु आता डायल 112 प्रणालीवर कॉल केला असता तक्रारदार याचे लोकेशन समजते. त्यामुळे तक्रारदार यांना तत्काळ मदत मिळत आहे.
दररोज 300 कॉल्स
पुणे पोलीस आयुक्तालयात सर्व तांत्रिक सुविधांसह सुसज्ज असे डायल 112 चे नियंत्रण कक्ष उभारलेले आहे. डायल 112 प्रणालीस जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून दररोज जवळपास 300 कॉल्सची वेळेत पूर्तता करण्यात येत आहे. डायल 112 ‘ प्रणाली व्यवस्थितपणे कार्यरत ठेवण्याकरीता 51 चारचाकी व 107 दुचाकीवर असे एकूण 157 वाहनांवर डायल 112चे डिव्हाईस बसविण्यात आले आहेत. यामध्ये 20 ० नवीन चारचाकी वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे. याप्रणाली संदर्भात 6 अधिकारी व जवळपास 500 पोलीस अंमलदार यांना पुणे व मुंबई येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षात वातानुकुलित यंत्रणा, अधिकारी व पोलीस अमंलदार यांच्या बसण्याची व्यवस्था आदी बाबींचे अत्याधुनिक करणे सुरू आहे.
School Open: शासनाचा आदेश धुडकावत MESTA ने शाळा सुरु केल्या, काय म्हणतात संघटनेचे अध्यक्ष?
शेतकऱ्यांचा नाद खुळा : कांद्याने झाली भरभराट, घरावर 150 किलोचा ‘स्टेचू’ उभारुन केली उतराई
मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांट, दिवसाला दीड हजार ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती होणार; आणखी वैशिष्ट्ये काय?