Neelam Gorhe : आदित्य ठाकरेंचा दौरा जाहीर असेल, घर ते कार्यालय किंवा कार्यालय ते घर नसेल; नीलम गोऱ्हेंचा तानाजी सावतांना टोला

मोहित कंबोज यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रावादीच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी टीका केली. दुसरीकडे आदित्या ठाकरेंच्या दौऱ्याविषयी माहिती देताना तानाजी सावंत यांनाही टोला लगावला.

Neelam Gorhe : आदित्य ठाकरेंचा दौरा जाहीर असेल, घर ते कार्यालय किंवा कार्यालय ते घर नसेल; नीलम गोऱ्हेंचा तानाजी सावतांना टोला
तानाजी सावंत यांना दौऱ्यावरून टोला लगावताना नीलम गोऱ्हेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 4:13 PM

अभिजीत पोते, पुणे : आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) पुणे दौरा अजून ठरलेला नाही. जेव्हा तो दौरा ठरेल त्यावेळेस आमच्या पक्षाचे प्रवक्ते बोलतील. त्याआधी तो दौरा तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल. आमचा दौरा हा जाहीर असेल. घर ते कार्यालय किंवा कार्यालय ते घर नसेल, असा टोला शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी तानाजी सावंत यांच्या दौऱ्यावरून लगावला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक व्हायरल झाले होते. यात घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर अशाप्रकारचा उल्लेख दिसून आला. त्यावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली. तसेच तानाजी सावंत यांच्या या दौऱ्याची खिल्लीही उडवण्यात आली. यावेळी भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचाही नीलम गोऱ्हे यांनी समाचार घेतला आहे.

‘न्यायालयाने कारवाई केली पाहिजे’

आज पुण्यात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी त्याच दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यासोबतच मोहित कंबोज ट्विट करून जे आरोप करत आहेत त्याचे उत्तर न्यायालय देईल. पण काही लोक न्यायालयात काय होणार आहे, हे सांगून स्वतःचा मोठेपणा घेत असतील तर तो त्यांचा दोष आहे, अशी टीकादेखील त्यांनी मोहित कंबोज यांच्यावर केली आहे. मोहित कांबोज हे कायदा धाब्यावर बसवून असे स्टेटमेंट देत असतील तर न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीदेखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

‘असे कधी घडले नाही’

मागील तीस वर्षात असे कधी घडले नाही, की न्यायालयात उद्या सत्र न्यायालयात फाशी होणार आहे, उद्या एखाद्याला सत्र न्यायालयामध्ये जामीन होणार आहे की नाही, यावर एखादा कायदेतज्ज्ञ जरी बसवला तरी त्याला सांगता येणार नाही. त्यामुळे कोणी कायदा धाब्यावर बसवणार असेल, तर न्यायदेवतेने याचा विचार केला पाहिजे, की त्यांनी कोणाला प्रवक्ता नेमला आहे का, असे गोऱ्हे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

मोहित कंबोज यांच्याकडून राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न

मोहित कंबोज यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रावादीच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी टीका केली. दुसरीकडे आदित्या ठाकरेंच्या दौऱ्याविषयी माहिती देताना तानाजी सावंत यांनाही टोला लगावला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.