Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोची पाहणी, पुढील टप्पा कधी सांगितले…

Pune Metro and Ajit Pawar| पुणे मेट्रोचे दोन टप्पे सुरु झाले आहे. मेट्रो अल्पवधीत लोकप्रिय झाली. पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळाला. यामुळे मेट्रोला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनी बैठक घेतली.

Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोची पाहणी, पुढील टप्पा कधी सांगितले...
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 9:02 AM

पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराचा विस्तार वाढल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीची अधिक गरज निर्माण झाली. पीएमपीएमएलची बस हा आतापर्यंत एकमेव पर्याय पुणे शहरात होता. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर गेल्या काही वर्षांपासून भर दिला जात आहे. पुणे मेट्रोचे दोन टप्पे १ ऑगस्टपासून सुरु झाले. पुणे शहरातील वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करण्यात आले होते. त्यानंतर आता मेट्रोचा पुढील टप्पा कधी सुरु होणार? यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली.

कधी सुरु होणार पुढील टप्पा

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रोचा रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंतचा टप्पा सुरु होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी बैठक घेतली. या बैठकीत हा टप्पा डिसेंबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोचा आणखी एक टप्पा मिळणार आहे. अजित पवार यांनी बैठकीत मेट्रोची कामे लवकर करण्याचे आदेश महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट कधीपासून

डिसेंबरमध्ये रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंत मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा टप्पा पूर्ण कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे. सध्या पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट अशी मेट्रो सुरु आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे काम अपूर्ण आहे. या मार्गात भुयार आहे. येत्या एप्रिलमध्ये सिव्हील कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्ग होणार असल्याची माहिती बैठकीत दिली गेली. त्यामुळे पिंपरी चिंचवडवरुन स्वारगेट कमी वेळेत पोहचता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद

पुणे मेट्रोला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. गणेशोत्सव काळात मेट्रोने उत्पन्नाचे नवीन विक्रम केले होते. या काळात रात्री उशिरापर्यंत मेट्रो सुरु ठेवण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत मेट्रो चालवण्यात आली. नागरिकांकडून मेट्रोला मिळालेल्या प्रतिसादामुळे महामेट्रोने शनिवारी आणि रविवारी तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनाही सवलतीत प्रवास करता येत आहे.

Non Stop LIVE Update
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.