पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी अतिरेक्यांना सिरियातून आदेश

| Updated on: Nov 07, 2023 | 10:38 AM

Nia on pune isis module : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आता आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा दशतवाद्यांचा कट होता. त्यासाठी त्यांना थेट सिरियातून आदेश मिळत होते.

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी अतिरेक्यांना सिरियातून आदेश
NIA
Follow us on

प्रदीप कापसे | 7 नोव्हेंबर 2023 : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) धक्कादायक दावे केले आहेत. दहशतवाद्यांची एनआयएने केलेल्या चौकशीची माहिती आरोपपत्रानंतर समोर आली आहे. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी त्या दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. पुणे शहरातील कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.

सिरियातून मिळत होते आदेश

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला. दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते. साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून दहशत निर्माण करण्याचा कट त्यांनी आखला होता. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध असल्याचे तपासातून समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

एनआयएने केले पुणे पोलिसांचे कौतूक

NIA च्या महासंचालकांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पत्र लिहिले आहे. त्यात पुणे पोलिसांचे कौतूक केले आहे. NIA ने बक्षीस जाहीर केलेल्या दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली. यामुळे दहशतवादाची पाळमुळे तपासण्यास मदत झाली. पुणे पोलिसांच्या कोथरुड पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हे शक्य झाले आहे. पुणे पोलिसांच्या या कामगिरीची राष्ट्रीय स्तरवर खूप मोठी मदत झाली आहे, असे एनआयएच्या महासंचालकांनी पत्रात म्हटले आहे. यामुळे सातत्याने टीकेला समोरे जावे लागणाऱ्या पुणे पोलिसांचे मनोधर्य या पत्रानंतर वाढले आहे.