Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत’, नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य

"मला विश्वास आहे, इंजिनियरचं संशोधन फार महत्त्वाचं आहे. ऋषीकेश सागर यांची माफी मागून सांगतो की, आम्ही पुढे नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जावू असा मला विश्वास आहे", असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

'पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत', नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य
नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 7:26 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज डिझेल गाड्यांबाबत मोठं वक्तव्य केलं. देशात पुढच्या 5 वर्षांत डिझेल गाडी दिसणार नाहीत, असा दावा नितीन गडकरी यांनी केलं. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते. “विश्वेश्वरैया यांची जयंती आपण इंजिनियर दिवस म्हणून साजरा करतो. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. मी महाराष्ट्रात ज्यावेळी बांधकाम मंत्री होतो, त्यावेळी सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा माझ्या डिपार्टमेंटचे दोन सचिव होते, तांबे साहेब आणि देशपांडे साहेब. त्या दोघांवर मी जबाबदारी टाकली की, तुम्ही मेरिटवर वर कुणाच्याही प्रभावाखाली न येता ज्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांची निवड करा”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“ज्यावेळी त्यांनी सिलेक्शन केलं, त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल डॉ. अलेक्झांडर साहेब यांना मी आमंत्रित करायला गेलो, मी त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा त्यांनी विचारलं की, तुम्ही सिलेक्शन कसं केलं? मी त्यांना सांगितलं की, मला यातलं काहीच माहिती नाही. ही सर्व निवड प्रक्रिया आमच्या दोन्ही बांधकाम कामाच्या सचिवांनी केलं आहे. मी त्यांना सूचना केली होती की, कुणाचाही प्रभाव तुमच्यावर आला तरी चिंता करायची नाही. फक्त मेरीटवरच इंजिनियरची निवड करायची. मग देशपांडे आणि तांबे साहेबांनी अलेक्झांडर यांना सर्व निवड प्रक्रिया सांगितली. यानंतर अलेक्झांडर यांनी वेळ दिला आणि मोठ्या उत्साहात तो कार्यक्रम पार पडला”, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.

‘विश्वेश्वरैया यांचं जीवन हे इंजिनियर्सकरता एक आदर्श’

“विश्वेश्वरैया यांचं जीवन हे इंजिनियर्सकरता एक आदर्श आहे. कारण ते मुंबईत बांधकाम विभागात डेप्युटी इंजिनियर म्हणून रुजू झाले होते. काही दिवस धुळ्याला होते. त्यानंतर त्यांनी 1888 मध्ये छोटी सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रात जवळपास 28 वर्षे काम केलं. त्यानंतर ते कर्नाटकात गेले. अनेक मोठमोठे ब्रिज, अनेक मोठमोठी धरणे बांधण्याची संधी त्यांना मिळाली. एक उत्तम प्रशासक, एक जिनियस इंजिनियर आणि विकासाच्या बाबतीत कमिटमेंट ठेवून काम करणारे दृष्टा ही त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण त्यांना अभिवादन करतो. त्यांची प्रेरणा, कर्तृत्व हे नक्कीच इंजिनियर्सला प्रेरणा देणारं ठरेल”, असं नितीन गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांच्याकडून टेस्ला कंपनीचं कौतुक

“आज कुठल्याही देशात त्याच्या प्रगतीच्या आणि विकासाच्या क्षेत्रात आज सगळ्यात मोठी भूमिका जी असेल तर त्या देशाने नवीन कोणती टेकनोलॉजी शोधलेली आहे, कोणतं इनोवेशन, रिसर्च केलेलं आहे, या आधारावर त्या देशाची प्रगती आणि विकास मोजला जातो. आज अमेरिकेने जगात अव्वल क्रमांक प्राप्त केलेला आहे. आपण आज टेस्लाचे ऋषीकेश सागर यांचा सत्कार केला. टेक्स्लाने ऑटो मोबाईल इंजिनियरिंगमध्ये किती मोठा बदल घडवून आणला ते आपण पाहिलं. अमेरिकेच्या वैभव आणि विकासात या कंपनीची भूमिका खूप महत्त्वाची आहे”, असं गडकरी यांनी सांगितलं.

‘येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात आपल्या इंडस्ट्रीची साईज…’

“आपल्या देशात आपण खूप काम करतो. ऑटो मोबाईल इंडस्ट्रीचा विषय माझ्याकडेच आहे. ज्यावेळेला मंत्री झालो तेव्हा ऑटो मोबाईल इंडस्ट्री सात लाख कोटींची होती. तेव्हा आपला नंबर सातवा होता, आता आपला नंबर जगात तिसरा झालेला आहे. आपण नुकतंच जपानला मागे टाकून तिसरा नंबर प्राप्त केला आहे. पहिला नंबर अमेरिका आहे, त्यांचं टोटल इंडस्ट्रीचं साईज 78 लाख कोटी आहेत, मग चीनचा 44 लाख कोटी आहे, यानंतर भारताचं 22 लाख कोटी इतकं आहे. आपल्या देशात सर्वात जास्त जीएसटी देणारी ही इंडस्ट्री आहे. साडेचार कोटी लोकांना जॉब देणारी ही इंडस्ट्री आहे. म्हणून मी आपल्या सर्व ऑटो मोबाईल इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांना बोलावलं आणि त्यांना विनंती केली येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात आपल्या इंडस्ट्रीची साईज 55 लाख कोटींची साईज करा”, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

‘डिझेल गाड्या दिसणारच नाहीत’

“पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील. मला विश्वास आहे, इंजिनियरचं संशोधन फार महत्त्वाचं आहे. ऋषीकेश सागर यांची माफी मागून सांगतो की, आम्ही पुढे नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जावू असा मला विश्वास आहे”, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'
राणेंनी आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली, 'त्याला आधी कंठ तरी फुटू दे...'.