कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही, ब्राह्मण महासंघाची पहिली प्रतिक्रिया

उलट मराठा आरक्षण लागू होऊ शकत नाही असे अनेक नियम आणि कायदे आजही लागू आहेत | Brahman Mahasangh chief Anand Dave

कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही, ब्राह्मण महासंघाची पहिली प्रतिक्रिया
आनंद दवे, अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 11:02 PM

पुणे: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळणे जवळपास दुरापास्त आहे. राजकीय संघटना, मराठा संघटनांचे नेते आणि अभ्यासकांना याची पुरेपूर जाणीव आहे. मात्र, कोणीही तसे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत करत नाही, असे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले. (Brahman Mahasangh chief Anand Dave on Maratha Reservation)

ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातंर्गत दिलेल्या आरक्षणाचे समर्थन केले. मराठा आरक्षण हे एक मृगजळ आहे. कोणताही कायदा, आयोग, समितीकिंवा अध्यादेश मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. उलट मराठा आरक्षण लागू होऊ शकत नाही असे अनेक नियम आणि कायदे आजही लागू आहेत, याकडे आनंद दवे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

राजकीय नेते, मराठा संघटनांचे नेते आणि अभ्यासकांना या परिस्थितीची पुरेपूर कल्पना आहे. फक्त ही गोष्ट स्पष्टपणे सांगण्याची हिंमत कोणीही करत नाही, असे दवे यांनी म्हटले.

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले EWS आरक्षण योग्य आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या निकषांत बसवायचेच असेल तर ते फक्त आर्थिक आरक्षणाद्वारे शक्य होईल. क्रीमिलेअर हे आर्थिक आरक्षणाचे पहिले पाऊस असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले.

‘EWS आरक्षण म्हणजे सरकारचा केविलवाणा निर्णय’

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या EWS आरक्षणाबाबत धोक्याची शक्यता वाटते, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. याबाबत न्यायालयात विचारणा केली का? राज्य शासनाच्या भूमिकेबाबत संशय वाटतो. राज्य सरकार हतबल झाले आहे. EWS आरक्षण म्हणजे राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न वाटतो, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

‘EWS आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण खटल्याचा खून’

राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) आरक्षण देऊन केवळ स्वत:ची सोय पाहिली आहे. हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या मराठा आरक्षण खटल्याचा (Maratha Reservation) खून असल्याची जळजळीत टीका मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंढरे यांनी केली.

संबंधित बातम्या:

मराठा समाजाच्या बाजूने आहात की विरोधात; मेटेंचं काँग्रेसला भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन

…तर मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळालंच पाहिजे, आबासाहेब पाटलांचा आक्रमक पवित्रा

Maratha reservation |..मग मराठा विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का?, वडेट्टीवारांचा सवाल

(Brahman Mahasangh chief Anand Dave on Maratha Reservation)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.