मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह बॅकफूटवर; म्हणाले, राज अयोध्येला आले तर…

राज ठाकरे यांना जेव्हा मी विरोध केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. लोकांमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड आक्रोस होता. त्यामुळे मी त्यांना विरोध केला होता.

मोठी बातमी ! राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे बृजभूषण सिंह बॅकफूटवर; म्हणाले, राज अयोध्येला आले तर...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 11:12 AM

पुणे: माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे अयोध्येत प्रवेश घेऊ शकत नाही. लष्कर आणि मिलिट्री घेऊन आले तरी राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही, अशी वल्गना करणारे भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह बॅकफूटवर गेले आहेत. पक्षाच्या भूमिकेचं माहीत नाही. पण राज ठाकरे अयोध्येला आल्यास त्यांचं स्वागत करू, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच बृजभूषण सिंह हे बॅकफूटवर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभूषण सिंह पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांच्यासोबतचा वाद जुना झाल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बृजभूषण सिंह हे नरमल्याचे दिसून आले होते. मात्र, आता त्यांनी थेट राज ठाकरे यांच्या स्वागताचीच भाषा केल्याने बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरे विरोध मावळला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

काहीच अशक्य नाही

काहीच अशक्य नाही. पण आम्ही एका पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आमच्या पक्षाची काय भूमिका असेल ते माहीत नाही. पण व्यक्तीगत रित्या मी राज ठाकरे यांचं स्वागत करेल. आम्हाला काहीच अडचण नाही, असं त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांचा निर्णय चांगला

जेव्हा मी राज ठाकरे यांच्या विरोधात मी आंदोलन केलं तेव्हा राज ठाकरे अयोध्येला आले नाही. त्यांनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला. हा चांगला विचार होता. त्यामुळे आता जर राज ठाकरे अयोध्येत आले तर मी व्यक्तिगतरित्या त्यांचं स्वागतच करेल. पक्षाच्या भूमिकेचं मला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तेव्हा लोकांमध्ये आक्रोश होता

राज ठाकरे यांना जेव्हा मी विरोध केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. लोकांमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड आक्रोस होता. त्यामुळे मी त्यांना विरोध केला होता. राज यांनीही अयोध्येला न येण्याचा निर्णय घेतला. ही चांगली गोष्ट झाली, असं त्यांनी सांगितलं.

तर पुण्यात प्रचाराला येईल

दरम्यान, पक्षाचा आदेश असेल आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मला बोलावलं तर मी पुण्यात येईल. पुण्यात घरोघरी जाऊन लोकांना मते मागेल. मुरलीधर मोहोळ हे पण नेते आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी बोलावलं तर मी महाराष्ट्रात येऊन प्रचार करेल, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....