पुण्यात रेबीजमुळे मृत्यूची संख्या शून्यावर, महापालिकेकडून 60 हजार कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण

महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून 2018 पासून पुणे शहर आणि परिसरात रेबीजमुळे (Rabies) एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं समोर आलं आहे.

पुण्यात रेबीजमुळे मृत्यूची संख्या शून्यावर, महापालिकेकडून 60 हजार कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 7:38 PM

पुणे : महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून 2018 पासून पुणे शहर आणि परिसरात रेबीजमुळे (Rabies) एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं समोर आलं आहे. गेल्या 4 वर्षांत 60 हजारहून अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि अॅन्टी रेबीज लसीकरण केलं असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. (No rabies patient has died in Pune since 2018)

2018 पासून एकाही रुग्णाचा रेबीजमुळे मृत्यू नाही

1997 मध्ये पुण्यात रेबीजने मृत्यू पावलेल्यांची संख्या 56 होती. ती 2017 मध्ये 10 पर्यंत खाली आली तर 2018 मध्ये रेबीजमुळे चार जणांचा मृत्यू झाला. 2018 पासून भटक्या कुत्र्यांना तीन वर्षांपर्यंत प्रभावी ठरणारी रेबीजची लस द्यावी असा निर्णय घेण्यात आला. त्याआधी केवळ एक वर्ष प्रभावी ठरणारी लस दिली जात होती. या निर्णयानंतर रेबीजमुळे मृत्यू झालेल्यांची नोंद झालेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

रेबीजमुळे होणाऱ्या मानवी मृत्यूचे प्रमाण 2030 पर्यंत शून्यावर आणण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा प्रयत्न आहे. त्यानुसार जगभरात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पुणे महानगरपालिकेनेही आपल्या उपाययोजनांवर भर दिला आहे.

महापालिकेकडून विविध उपाययोजना

2009 ते 2019 या दहा वर्षांच्या काळात पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 40 हजारांवरून अडीच लाखांवर गेली आहे. याची दखल घेत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महानगरपालिकेने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं, त्यांचं अॅन्टी रेबीज लसीकरण करण्यासह भटकी कुत्री पकडण्यासाठी नवी वाहने घेणे, त्यांच्यासाठी श्वानगृह बांधणे, सध्याच्या श्वानगृहांची क्षमता वाढवणे, कॉलर लावणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत.

दोन संस्थांची महापालिकेकडून नियुक्ती

भटकी कुत्री पकडण्यासाठी सध्या महापालिकेकडे पाच वाहनं आहेत. त्यात आणखी पंधरा वाहनांची भर पडणार आहे. सोबतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरणासाठी सात नवी केंद्र सुरू केली जाणार आहेत. शिवाय श्वान पकडणे, त्यांचं निर्बीजीकरण करणे आणि त्यांना परत सोडून देण्यासाठी दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. काम वेगाने होण्यासाठी आणखी दोन संस्थांची नियुक्ती करण्याचा विचार सुरू आहे.

संबंधित बातम्या :

पोलीस आयुक्तालयात पेटवून घेणाऱ्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू, पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पुण्यातल्या ‘अॅमिनिटी स्पेस’ खासगी विकासकांना भाडेकराराने देणार, कोट्यवधींचं उत्पन्न मिळवण्याचं नियोजन, काय आहे नेमकं प्रकरण?

पिंपरी-चिंचवड महापालिका लाचखोरी प्रकरण, स्थायी समितीच्या अध्यक्षांसह तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.