Pune unlock: पुणे शहर अनलॉक होतंय, पण ग्रामीणचं काय होणार?; अजित पवारांनी सांगितलं काय सुरू, काय बंद?
पुण्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट सरासरीपेक्षा कमी आल्याने पुण्यात निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र पुणे ग्रामीणमध्ये निर्बंधात शिथिलता देण्यात आली नाही. (no relief for corona restrictions to pune rural, says ajit pawar)
पुणे: पुण्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट सरासरीपेक्षा कमी आल्याने पुण्यात निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र पुणे ग्रामीणमध्ये निर्बंधात शिथिलता देण्यात आली नाही. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पुढील आठवड्यात पुणे ग्रामीणबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगतानाच पुणे ग्रामीमला लेव्हल 3चे निर्बंध लागू राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. (no relief for corona restrictions to pune rural, says ajit pawar)
अजित पवार यांनी आज दिवसभर पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी, महापौर, पालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधींसोबत त्यांनी ही आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची मोठी घोषणा केली. परंतु, पुणे ग्रामीणमधील 13 जिल्ह्यात संपूर्ण सूट देण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे ग्रामीणमधील 13 तालुक्यांना लेव्हल 4 ऐवजी लेव्हल 3 ची नियमावली लागू करण्यात आली आहे.
सरासरी रेट 5च्या आत आल्यावरच निर्णय
पुण्यातील ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हीटी दर 5.5 टक्के आहे. त्यामुळे ग्रामीण भागात संपूर्णत: शिथिलता देता येणार नाही. पण ग्रामीणमध्ये लेव्हल 4च्या ऐवजी लेव्हल 3चे निर्बंध कायम राहतील, असं त्यांनी सांगितलं. पुणे ग्रामीणमधील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यावर पुढील आठवड्यात आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या पुण्याचा आठवड्याचा सरासरी रेट 3.3 टक्के आहे. तर पिंपरीचा रेट 3.5 टक्के आहे. पुणे ग्रामीणचा रेट 5.5 टक्के आहे. हे रेट पाचच्या आत आल्यावरच ग्रामीणमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.
दुकानांची नवी वेळ
पुणे ग्रामीणमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी मास्क वापरलाच पाहिजे. नियमांचं पालन केलंच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
ग्रामीणचा पॉझिटिव्हीटी रेट (टक्क्यात)
आंबेगाव – 6 बारामीती – 4.3 भोर – 2.9 दौंड – 7.2 हवेली – 4.9 इंदापूर – 6.5 जुन्नर – 7.2 खेड – 5.5 मावळ – 4.9 मुळशी – 3.4 पुरंदर – 6.1 शिरुर – 7.1 वेल्हा – 1 (no relief for corona restrictions to pune rural, says ajit pawar)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 August 2021 https://t.co/PTDTKMxTXE #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 8, 2021
संबंधित बातम्या:
Pune Corona Update : ‘शिथिलता दिली आहे, पण….’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा
(no relief for corona restrictions to pune rural, says ajit pawar)