AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune water supply : पुणेकरांनो, ‘हे’ चार दिवस ‘पाणीबाणी’ नाही, सुरळीत राहणार पाणीपुरवठा, वाचा सविस्तर…

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही समस्या किंवा गैरसोय होवू नये, म्हणून महापालिकेने पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune water supply : पुणेकरांनो, 'हे' चार दिवस 'पाणीबाणी' नाही, सुरळीत राहणार पाणीपुरवठा, वाचा सविस्तर...
संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 7:13 PM

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी… आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात तीन दिवस पाणीकपात (Water cut) रद्द करण्यात आली आहे. 8 ते 11 जुलै दरम्यान शहरात दररोज पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यानंतर धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पाणीकपातीच्या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे. नुकताच पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला होता. आता 4 जुलैपासून ते 11 जुलैपर्यंतचे वेळापत्रकही महापालिकेने ठरवले होते. मात्र रविवारी (ता. 10) आषाढी एकादशी तसेच बकरी ईद असल्यामुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पाणीकपात होणार नाही.

पाण्याच्या समस्येने पुणेकर त्रस्त

यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांना पाण्याच्या टंचाईने हैराण केले होते. महापालिकेच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामांवरही संताप व्यक्त केला होता. दर आठवड्याला नेमकी कसली देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जातात, असा संताप पुणेकर व्यक्त करत होते. त्यात मान्सूननेही विलंब केला. त्यामुळे पाणीटंचाईत अधिकच भर पडली. तर महापालिकेने पाऊस कमी पडल्याचे कारण सांगून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले. अधिक पाऊस झाल्यानंतर या निर्णयात बदल करण्यात येणार होता. दोन दिवसांपूर्वी मोसमातला चांगला पाऊस पुण्यात झाला. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट लवकरच दूर होईल, अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.

pmc water

हे सुद्धा वाचा

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून…

आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणतीही समस्या किंवा गैरसोय होवू नये, म्हणून महापालिकेने पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर म्हणजेच 11 जुलैपासून पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक जारी केले जाणार आहे. दरम्यान, कालच पुणे वेधशाळेने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. साधारण 6 जुलै म्हणजे आज ते 8 जुलैदरम्यान हा मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची महापालिकेला आशा आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.