Pandharpur wari : ‘इंद्रायणी’चं प्रदुषित पाणी वापराल तर…; आळंदी नगरपरिषदेनं वारकऱ्यांना केलं सावध, वाचा काय म्हटलं?

21 जून रोजी पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या आळंदीत दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यात सहभागी होण्यास वारकरी येथे दाखल झाले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे नगर परिषदेतर्फे सांगण्यात आले आहे.

Pandharpur wari : 'इंद्रायणी'चं प्रदुषित पाणी वापराल तर...; आळंदी नगरपरिषदेनं वारकऱ्यांना केलं सावध, वाचा काय म्हटलं?
प्रदुषित झालेली इंद्रायणी नदीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:35 PM

पुणे : इंद्रायणी नदीचे (Indrayani river) प्रदूषित पाणी वापरू नये, असे आवाहन आळंदी नगर परिषदेने केले आहे. एक आदेश जारी करून पुढील काही दिवस हे प्रदुषित पाणी न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. वारी पंढरीकडे निघणार आहे. राज्यभरातून भाविक, वारकरी (Warkaris) आळंदीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अंकुश जाधव म्हणाले, की राज्यभरातून आळंदीत वारकरी येतात. ते नदीत स्नान करतात. काही जण तर नदीचे पाणी पितात. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही प्रथा रोखण्यासाठी आम्ही एक विशिष्ट आदेश जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्यात विषारी फेसाचा (Toxic foam) जाड थर निर्माण झाला आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

गाळ काढण्याचे काम

21 जून रोजी पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या आळंदीत दरवर्षीप्रमाणे पालखी प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यात सहभागी होण्यास वारकरी येथे दाखल झाले आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. शनिवारी आम्ही घाट भागातून जलकुंभ साफ केला आहे, जिथे जास्तीत जास्त वारकरी नदीत पवित्र स्नान करतात. त्यामुळे पुढील काही दिवस शहरात राहताना त्यांना अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष टीम

नदीच्या स्वच्छतेसाठी कामगार आणि अर्थमूव्हर्सची एक टीम तयार केली आहे. टीमने नदीतून आधीच जलकुंभ काढला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय राज्य पाटबंधारे विभागाने शनिवारी देहू येथील धरणातून पाणी सोडले आहे, अशी माहिती देण्यात आली. इंद्रायणी नदीत अनेक भाविक स्नान करत असतात. तर काही भाविक इंद्रायणीचे पाणी तीर्थ म्हणून पितात. मात्र आता इंद्रायणीचे पाणी अस्वच्छ झाले आहे. या पाण्यात स्नान करणे तर लांबच हातपायदेखील धुणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. यासर्व आरोग्य समस्या उद्भवण्याच्या आधीच आळंदी नगर परिषदेने वारकऱ्यांना सतर्क केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.