पुणे – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील (Pune-Mumbai highway)अपघाताचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कराचा अपघात झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोने ट्रकला धडक (Accident)दिल्याची घटना घडली आहे. मागील पंधरा दिवसातील ही चौथी घटना आहे. अपघातात पिकअपमधील सर्व केळी रस्त्यावर केळी विखुरली गेल्यानं इतर वाहने घसरू लागली.वाहनांच्या घरासण्यानं दुसरी कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये. यासाठी तळेगांव दाभाडे पोलिसांनी (Talegaon Dabhade police) प्रसंगावधान राखतय आर बी देवदूत रेस्क्यू पाचारण करण्यात आले. अपघात घडलेल्या ठिकाण साफ करण्यात आले.या अपघात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे.
असा झाला अपघात
पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जात असताना पिकअप टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पिकअप टेम्पो ट्रकव जाऊन आदळला. यामुळे पिकअप टेम्पोमधील सर्व केळी रस्त्यावर विखुरली गेली. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर केळी पडल्याने अणे वाहनेही घरसल्याची घटना घडू लागल्या मात्र प्रसंगावधन राखत पोलिसांनी आर बी देवदूत रेस्क्यू पाचारण करत रस्ता साफ केला.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू
पंधरा दिवसांपूर्वी मावळ येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नारायणगाव जुन्नर रोडवर झालेल्या अपघातातही दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढण्यात आले होते.
‘पुढच्या वेळी अर्जुन तेंडुलकरला सोडणार नाय’; गुजरात टायटन्सच्या ट्विटची चर्चा
ऐतिहासिक ‘रामसेतू’वरून नाशिककर विरुद्ध प्रशासन आमने-सामने; पूल पाडण्याचे काय सांगितले कारण?