पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता आळंदीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण ? ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर
पुणे जिल्ह्यातीलच आळंदी येथे ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. या रुग्णाचे नमुने जेनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
पुणे : राज्यात ओमिक्रॉन याा कोरोनाच्या नव्या अवताराचा संसर्ग राज्यात वाढत असल्याचे दिसत आहे. डोंबिवलीनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ओमिक्रॉनचे एकूण सात रुग्ण आढळले आहेत. यानंतर आता पुणे जिल्ह्यातीलच आळंदी येथे ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. या रुग्णाचे नमुने जेनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
आळंदी येथील रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवले
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ओमिक्रॉनची बाधा असलेले सात जाण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांना कोणतीही लक्षणे नुसून त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर आळंदीय येथे आणखी एक संशयित व्यक्ती आढळून आला आहे. त्याचे नमुने जेनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये
पुण्यात सध्या आठ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले असले तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळवे, घाबरून जाऊ नये, असे आमचे नागरिकांना आवाहन आहे. तसेच लसीकरण करुन प्रतिबंधक उपाय यांची अमंलबजावणी नागरिकांनी करावी, असे पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी आवाहन केले आहे.
नागरिकांचे उद्यापासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग
दरम्यान, ओमिक्रॉनचे रुग्ण आढळताच पुणे जिल्ह्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ओमिक्रॉनबाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांचे उद्यापासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग केले जाणार आहे. ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलमधील बेडसंदर्भात पुरेसं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ . भगवान पवार यांनी ही माहिती दिली आहे.
इतर बातम्या :