पुण्यात 1 पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनबाधित, लस घ्या अन् कोरोना नियम पाळा; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

राज्यातील ओमिक्रॉनग्रस्तांचा आकडा आता आठवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी खास बातचित केली आहे. त्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करा तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्या असे आवाहन केले आहे.

पुण्यात 1 पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनबाधित, लस घ्या अन् कोरोना नियम पाळा; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 11:35 PM

पुणे : कोरोनाचे नवे रुप म्हणजेच ओमिक्रॉन या विषाणूचा संसर्ग वाढत चालला आहे. डोंबिवलीनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे या विषाणूने शिरकाव केला आहे. आज पुण्यात एक आणि पिंपरी चिंचवड येथे सहा असे एकूण सात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉनग्रस्तांचा आकडा आता आठवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी खास बातचित केली आहे. त्यांनी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना नियमांचे पालन करा तसेच कोरोना प्रतिबंधक लस घ्या असे आवाहन केले आहे.

पहिल्या दिवसापासून रुग्णांना ट्रेस केलं होतं

पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी बोलताना पिंपरी चिंचवड येथे आढळलले एकूण सात रुग्ण कोणते आहेत. ते कोठून आलेले आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिलीय. “एक नायजेरीयन सिटीझन असलेली 45 वर्षीय महिला पिंपरी चिंचवड येथे आली होती. त्या त्यांच्या भावाकडे आल्या होत्या. त्यांच्यासोबत दोन मुलीदेखील आल्या होत्या. या महिलेचा भाऊ, महिलेच्या भावाची दोन मुलं. महिलेच्या दोन मुली आणि ही महिला अशा एकूण सहा जणांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून ट्रेस केलं होतं. त्यांना पहिल्या दिवसापासून क्वॉरन्टाईन केलं होतं. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीतेय. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तेरा जणांना ट्रेस करण्यात आलं आहे. त्यांचे स्पॅम्पल पाठवले होते,” अशी माहिती आयुक्त राजेश पाटीला यांनी दिलीय.

नागरिकांनी लस घ्यावी, कोरोना नियम पाळावे

तसेच पुढे बोलताना त्यांनी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळवे, घाबरून जाऊ नये. लसीकरण करुन प्रतिबंधक उपायांची अमंलबजावणी नागरिकांनी करावी, असे आवाहन जनतेला केले.

सहापैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती

दरम्यान, सहा पैकी तिघांनी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतरही त्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. तिघे नायजेरियाहून आले आहेत. त्यापैकी इतर तिघे त्यांच्या संपर्कात आले होते. यात एक महिला महिला आणि त्यांचा 45 वर्षाचा भाऊ, दीड वर्ष आणि 17 वर्षाच्या मुलींचाही समावेश आहे. 24 नोव्हेंबरला नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची महिला पिंपरी-चिंचवडमध्ये आली होती, ज्या 18 वर्षाखालील तीन लहान मुलांचा समावेश आहे त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही, तर आणखी एक बाधित तरुण फिनलंडवरून आला होता.

इतर बातम्या :

Girish kuber : याआधी शेतकरी आणि या लिखानामुळे कुबेर वादात, काय होती प्रकरणं? वाचा सविस्तर

Girish kuber : हे लिहिल्यामुळे गिरीश कुबेरांवर नाशकात शाईफेक, काय होता मजकूर? वाचा सविस्तर

पुन्हा सैराट ! पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने भावने केली हत्या, बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं, महाराष्ट्र हादरला

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....