देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचे निर्बंध लादण्याचा कोणताही निर्णय नाही: राजेश टोपे

देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही.

देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचे निर्बंध लादण्याचा कोणताही निर्णय नाही: राजेश टोपे
rajesh tope
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 8:15 PM

पुणे: देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.

कोविडचे नियम पाळा

संभाव्य धोक्यापासून वाचायचं असेल तर आज काय करावं तर कोविडचे नियम पाळले पाहिजेत. अजून काही प्रोटोकॉल असतील तर जागतिक आरोग्य संघटना त्याबाबतचे निर्देश देईल. त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रिस्क कंट्रीतून आलेल्यांचे पासपोर्ट तपासणार

आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंट आल्याची माहिती मिळताच आम्ही गेल्या 15 दिवसात किंवा हा व्हायरस आल्यापासूनच्या आधीपासून किती लोक महाराष्ट्रात आले याची यादी मागवली आहे. कारण या नागरिकांवर लक्ष ठेवता येणार आहे. डोमेस्टिक फ्लाईटबाबत चर्चा झाली. पण निर्णय झाला नाही. एखादा व्यक्ती रिस्क कंट्रीतून आला नसेल तर त्याची तपासणी केली जात नाही. मात्र, तरीही पाच टक्के लोकांची टेस्ट करण्यास सांगितलं आहे. या सर्वांचा पासपोर्ट तपासून त्यांच्या तपासण्या करण्यात येणार आहे. डोमेस्टिक पॅसेंजरबाबत काही प्रोटोकॉल करण्याचा विचार आहे. आपण संबंधित विभागांना पत्रं पाठवलं आहे. त्यांचं उत्तर आल्यावर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. तसेच ओमिक्रॉनबाबत कोणताही निर्णय घेताना विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

महिलांवरील अत्याचार वाढण्यास आघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra School Reopening | राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार, शासन निर्णय जारी

VIDEO: दोन लग्न आणि एका साखरपुड्याची गोष्ट! राऊत, ठाकूर, पाटलांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; पाहा, विवाह सोहळ्यांचा थाटमाट

लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.