AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापालिका निवडणूक | कशी ठरणार एक सदस्यीय प्रभाग रचना? कधी होणार निवडणूक? वाचा सविस्तर

पुणे, (Pune) पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये (Municipal Corporation) 'एक प्रभाग एक नगरसेवक' (One ward one Corporator) पद्धतीनुसार आगामी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यात महापालिका निवडणुकांचं (Municipal Elections) बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिका निवडणूक | कशी ठरणार एक सदस्यीय प्रभाग रचना? कधी होणार निवडणूक? वाचा सविस्तर
पुणे महानगरपालिका
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 11:50 AM
Share

पुणे : पुणे, (Pune) पिंपरी चिंचवडसह (Pimpri Chinchwad) राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये (Municipal Corporation) ‘एक प्रभाग एक नगरसेवक’ (One ward one Corporator) पद्धतीनुसार आगामी निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) यासंदर्भात अध्यादेश काढला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात महापालिका निवडणुकांचं (Municipal Elections) बिगुल वाजण्याची शक्यता आहे. सोबतच कच्च्या प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून निवडणुक प्रक्रियेच्या तयारीला लागण्याचे आदेशही संबंधित महापालिका प्रशासनाला निवडणूक आयोगाने दिले आहेत. (One member ward structure will be decided for Pune Municipal Corporation election)

फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाकडे काही महिन्यांचाच अवधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत मुदतीत निवडणुका घेण्यासाठी उद्यापासूनच प्रभाग रचनेचं काम हाती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ करण्यात आलेल्या किंवा वगळण्यात आलेल्या क्षेत्रांचा विचार करून प्रभाग आखण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. यासोबतच प्रभाग रचना, त्यावरच्या हरकती-सूचना, आरक्षण सोडत ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

2011 च्या जणगणनेनुसार ठरणार प्रभाग

निवडणूक आयोगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातल्या 18 महानगरपालिकांमध्ये एक प्रभाग एक सदस्य पद्धतीनुसार निवडणूक होईल असं स्पष्ट केलं आहे. 2021 ची जनगणना झाली नसल्याने 2011 च्या जनगणनेनुसारच ही प्रभाग रचना केली जाणार आहे. एका प्रभागात सरासरी 21 हजार 423 मतदार असणार आहेत. आयोगाच्या निकषानुसार किमान मतदारांची संख्या ही सरासरीच्या 10 टक्के कमी आणि कमाल मतदारांची संख्या सरासरीच्या 10 टक्के जास्त असू शकतात. त्यानुसार एका प्रभागात कमीत कमी 19 हजार 221 मतदार तर जास्तीत जास्त 23 हजार 565 मतदार असू शकतात.

अशी ठरणार प्रभागरचना

प्रभाग रचनेनुसार प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच प्रभाग रचना केली जाणार आहे. यामध्ये मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते उड्डाणपूल या यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या :

पुणे, पिंपरी चिंचवडसाठी आता ‘एक प्रभाग एक नगरसेवक पद्धत’, महापालिकेत राजकीय समीकरणं बदलणार?

जातीनिहाय जनगणनेसाठी बिहारमधील सत्ताधारी एकवटले; रोहित पवार म्हणाले..

भाजप आमदार राहुल कुल यांना धक्का, साखर कारखान्याला जप्तीची नोटीस

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.