Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune GBS Disease : पुण्यात GBS ची दहशत, टेन्शन वाढवणारी बातमी, आणखी एक मृत्यू

Pune GBS Disease : पुण्यात ‘जीबीएस’चे रुग्ण आधीपासून आढळत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या वर्षी शहर परिसरातील खासगीसह सरकारी रुग्णालयांमध्ये ‘जीबीएस’च्या 185 रुग्णांची नोंद झाली होती.

Pune GBS Disease : पुण्यात GBS ची दहशत, टेन्शन वाढवणारी बातमी, आणखी एक मृत्यू
GBS Disease
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 7:34 AM

पुण्यासह राज्यातील अन्य भागात सध्या गुइलेन बॅरे सिंड्रोम नावाच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस GBS आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आता राज्यात GBS रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा ‘जीबीएस’ने मृत्यू झाला आहे. या आजाराचा हा दुसरा बळी आहे. संबंधित रुग्ण नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) नांदोशी येथील रहिवासी होत्या. त्यांना 15 जानेवारीला अशक्तपणा आणि अर्धांगवायूची लक्षणे जाणवू लागली. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती बिघडल्याने 17 जानेवारीला ससून रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना त्यांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला. श्वसनक्रिया थांबण्यासह अर्धांगवायूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमची जास्त रुग्ण आढळल्याने तेथे महापालिकेच्या पथकांनी अतिसार, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण केले होते. रुग्णसंख्या वाढीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने बुधवारी पुन्हा या भागाचे सर्वेक्षण केले.

ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळले

शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून सिंहगड रस्ता परिसरातील जलस्राोतांसह खडकवासला धरणातील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रिया न करता पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

पाणी गाळून, उकळून पिण्याचे आवाहन

गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल, विहिरीचे पाणी तपासून वापरावे. पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

जानेवारी महिन्यात रुग्ण अचानक वाढले

पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या यंदा जानेवारी महिन्यात अचानक वाढली. ही रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होऊ लागले. याचबरोबर ‘जीबीएस’बाबत अनेक गैरसमज पसरू लागले. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि सरकारी रुग्णालयांकडून 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत आढळलेल्या जीबीएस रुग्णांची आकडेवारी जमा केली.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.