फसवणुकीची अशी पद्धत आजपर्यंत पाहिली नसणार, पाहा पुणे शहरातील महिलेला कसे गंडविले

डिजिटल चोरट्यांनी तिची 11.5 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. व्यवसायाने इंजिनिअर असलेली ही महिला एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तिची ऑनलाइन फसवणूक झाली.

फसवणुकीची अशी पद्धत आजपर्यंत पाहिली नसणार, पाहा पुणे शहरातील महिलेला कसे गंडविले
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 8:52 AM

पुणे : डिजिटलच्या युगात चोरटे डिजिटल झाले आहेत. लोकांना गंडवण्याचे नवनवीन प्रकार ते शोधत आहेत. आता पुणे (pune crime news) येथील महिलेची चोरट्यांनी फसवणूक केली आहे. परंतु फसवणुकीचा हा प्रकार अद्यावत आहे. आतापर्यंत अशी फसवणूक केल्याचे उदाहरण समोर आलेले नाही. पुण्यातील २४ वर्षीय महिला फसवणुकीची बळी ठरली. डिजिटल चोरट्यांनी तिची 11.5 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. व्यवसायाने इंजिनिअर असलेली ही महिला एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. तिची ऑनलाइन फसवणूक झाली. फसवणूक झाल्यानंतर तिने आता पोलीस स्टेशन गाठले आहे. परंतु या प्रकारामुळे पोलीस अचंबित झाले आहे.

कशी केली फसवणूक

जानेवारी २०२३ चा दुसरा आठवडा होता. त्या महिलेला इंस्टाग्रामवरुन एका व्यक्तीने संपर्क केला. त्याने तिला मी भारतीय आहे, पण अमेरिकेत राहतो, असल्याचे सांगितले. त्या दोघांमधील संवाद वाढत गेला. पुढे दोघांनी एकमेकांचे क्रमांक शेअर केले. त्यानंतर इन्स्टाग्रामवरुन सुरु झालेली चर्चा व्हॉट्सअ‍ॅपपर्यंत आली.

हे सुद्धा वाचा

मग त्या डिजिटल चोरट्याने “सोने आणि हिऱ्याचे दागिने घ्याल का?” असा प्रश्न विचारला. त्याने पोलंडमधून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणले होते. त्याची तो विक्री करणार होता. हे दागिने तो त्या महिलेला देणार होता. त्यात खरेदी केलेल्या रत्नांसह काही परकीय चलनही होते. महिला दागिने घेण्यास तयार झाली. यानंतर महिलेला कस्टम क्लिअरन्सची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले.

अन् महिलेला फोन

महिलेने दागिने घेण्यास होकर दिल्यानंतर तिला फोन येऊ लागले. फोन करणारे स्वत:ला कस्टम अधिकारी असल्याचे सांगत होता. तो महिलेकडे पैसे मागायचे. हे पैसे कस्टम ड्युटी, कोर्ट फी, मनी लाँडरिंग चेक चार्जेस, पोलीस व्हेरिफिकेशन फी, ट्रान्सफर चार्जेस, इन्शुरन्स आणि स्टॅम्प चार्जेससाठी असल्याचे सांगत होता.

महिलेने हळूहळू करत 11.5 लाख रुपये जमा केले. परंतु आपली फसवणूक झाल्याचे तिला लक्षात आले. तिने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीशी संबंधित आयपीसी कलमांसह आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.