नाझरे धरणात यंदा केवळ 24% पाणीसाठा, धरणाची पाणीपातळी 25 दिवसांपासून स्थिरच

पुरंदर परिसरात पावसाने ओढ दिल्याने नाझरे धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्यात पर्जन्यराजाने धरण परिसराकडे पाठ फिरवल्याने नाझरे धरणातील पाणी पातळी गेल्या 25 दिवसांपासून स्थिर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या धरणात 24 टक्के पाणीसाठा आहे.

नाझरे धरणात यंदा केवळ 24% पाणीसाठा, धरणाची पाणीपातळी 25 दिवसांपासून स्थिरच
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 12:51 PM

पुणे : पुरंदर परिसरात पावसाने ओढ दिल्याने नाझरे धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्यात पर्जन्यराजाने धरण परिसराकडे पाठ फिरवल्याने नाझरे धरणातील पाणी पातळी गेल्या 25 दिवसांपासून स्थिर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या धरणात 24 टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी ऑगस्ट 2020 नाझरे धरण शंभर टक्के भरले होते. यंदा मात्र केवळ 24 टक्क्यांच्या आतबाहेर येऊन जवळपास पंचवीस दिवसापासून स्थिरावले आहे. यामुळे नाझरेवर अवलंबून असलेल्या पुरंदर-बारामती तालुक्यातील शेतकरी, नागरिक तसंच औद्योगिक वसाहतींचं लक्ष धरण पूर्णतः भरणार का आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार का? याकडे लागलं आहे.

नाझरे धरणक्षेत्रात कमी पाऊस, धरणाची पाणी पातळी घटली

सलग तीन वर्ष ऑगस्ट महिन्यात नाझरे धरण शंभर टक्के भरत होते. मात्र यंदा धरण लाभक्षेत्रात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने व महिन्याभरापासून थांबल्याने नाझरे धरणाची पाणीपातळी वाढण्याऐवजी घटली आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागात पावसाने ओढ दिल्याने दोन तालुक्याला वरदायिनी असणाऱ्या नाझरे धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असून ही बाब अत्यंत चिंताजनक ठरणारी आहे.

हवामान खात्याकडून 3-4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

गेले काही दिवस कुठे रिपरिप तर कुठे संततधार बरसात करीत असलेल्या पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यादृष्टीने खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात कुठे कुठे पावसाचा अंदाज?

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच जाहीर केले होते. कोकणात गेले काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात पावसाचा मुक्काम असल्यामुळे बाप्पाच्या तयारीवर परिणाम होत आहे. खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पावसाच्या हजेरीमुळे तारांबळ उडत आहे. मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात पाऊस वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

(Only 24% water is stored in Nazare dam this year, the water level of the dam has been stable for 25 days)

हे ही वाचा :

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, वानवडी बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

औरंगाबादेत गुंडगिरी सुरुच, गेटसमोर थांबू नका सांगितल्याचा राग, टोळक्याची तोडफोड

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.