Pimpri-Chinchwad : पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक ; नागरिकांनो पाणी जपून वापरा
यंदा उन्हाळा तीव्र असल्याने, नागरिकांचा पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणीही अधिक असल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाली आहे. जूनमध्ये पाऊस उशीरा आल्यास पाण्याच्या काही प्रमाणात तुटवडा निर्माण होवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
पुणे- यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने पवना धरणांमधील (Pavana dam) पाण्याची मागणी वाढलीय आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पिंपरी चिंचवड(Pimpri-Chinchwad) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीपेक्षा 6 टक्के कमी पाणी कमी झाले असून, जून अखेरपर्यंत पाणी पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . आजमितीला धरणात 30.75 टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 6 टक्क्यांनी कमी आहे. हा पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल. परंतु, पावसाने (Rain)ओढ दिल्यास पाणी टंचाई जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे.
नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा
पवना धरणात सद्य स्थितीला केवळ 30.75 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी या अखेर 36.65 टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी तब्ब्ल 6 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. यंदा उन्हाळा तीव्र असल्याने, नागरिकांचा पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याची मागणीही अधिक असल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये घट झाली आहे. जूनमध्ये पाऊस उशीरा आल्यास पाण्याच्या काही प्रमाणात तुटवडा निर्माण होवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता सामीर मोरे यांनी केले आहे.
पाणीसाठा झपाट्याने कमी होईल
पवना धरणातून पिंपरी चिंचवडसह नजीकच्या विविध गावात पाण्याचा पुरवठा केला जातो. हे धरणच या गावांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. सद्यस्थितीला मागणनुसार या गावांना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र येत्या काही काळात पाण्याची मागणी वाढली तर धरणातीला पाणीसाठा झपाट्याने कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पिंपरी मावळ येथील शेतीसाठी ही याच पाण्याचा वापर केला जाण्याची शक्यता असते.