rain update | गणरायाच्या विसर्जनालाही पाऊस असणार, राज्यात ऑरेंज अन् यलो अलर्ट

monsoon rain update | यंदा गणरायाच्या आगमनाच्या वेळी वरुणराजाने गणपतीचे स्वागत केले. आता विसर्जन मिरवणुकीतही गणरायास निरोपाच्यावेळी उपस्थित राहणार आहे. पुणे हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

rain update | गणरायाच्या विसर्जनालाही पाऊस असणार, राज्यात ऑरेंज अन् यलो अलर्ट
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 9:14 AM

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : यंदा मान्सून उशिराने सुरु झाला. राज्यात २५ जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार बरसला. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत असताना ऑगस्ट महिन्यात पावसाने सुट्टी घेतली. यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले होते. सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. गणरायाच्या आगमनच्या प्रसंगी राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. आता विसर्जन मिरवणुकीत पाऊस असणार आहे. यामुळे गणरायाचे स्वागत आणि निरोपाला वरुणराजाची हजेरी असणार आहे. राज्यात गुरुवारी काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात पुढील चार दिवस पाऊस

राज्यात सर्वत्र चांगला पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर अजून चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागने व्यक्त केला आहे. गुरुवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर इतर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. जळगाव, नंदुरबार जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.

विदर्भात पुढचा आठवडा जोरदार पावसाचा

विदर्भात पुढील पूर्ण आठवड्यात जोरदार पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढील आठवड्यात पाऊस सक्रिय असणार आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळमध्ये पाच दिवस येलो अलर्ट तर इतर जिल्ह्यात 3 दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात नुकतेच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झाला आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत १ हजार ११७.५ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आतापर्यंत १ हजार ११५.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुंबई, कल्याण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडे कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. कल्याणमधील शिवाजी चौकात मुसळधार पावसामुळे मोठे प्रमाणात पाणी साचले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.