एसटी महामंडळाचा खाजगी वाहतूकदारांना दणका, नवा निर्णय काय? वाचा सविस्तर
पुण्यातली एसटी बससेवा सुरू होताच एस एसटी महामंडळाने खाजगी वाहतूकदारांना दणका दिलाय, कारण स्वारगेट आगार आणि पुणे विभागातील डेपोतून होणारी खाजगी वाहतूक बंद करण्याचे आदेश काढण्यात आलेत.
गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (St workers strike) संप सुरू आहे, काही ठिकाणी काही बसेस (bus) सुरू झाल्या आहेत, मात्र काही ठिकाणी अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे, त्यामुळे या काळात लोकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. त्यामुळे खासगी वाहतूकदारांना ‘अच्छे दिन’ आले. अनेक खासगी वाहतुकदारांनी भाडे वाढवले, त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागल्याचे दिसून आले. पुण्यातली एसटी बससेवा सुरू होताच एस एसटी महामंडळाने खाजगी वाहतूकदारांना दणका दिलाय, कारण स्वारगेट आगार आणि पुणे विभागातील डेपोतून होणारी खाजगी वाहतूक बंद करण्याचे आदेश काढण्यात आलेत. खाजगी वाहतूकदारांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. काल रात्री एसटी महामंडळानं काढलं पत्रक काढत हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे खासगी वाहतुकदारांचे मोठे नुकसान होणार आहे.
दोन महिन्यांपासून खासगी वाहतूक तेजीत
गेल्या दोन महिन्यांपासून अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने खासगी वाहतूक तेजीत होती, त्यामुळे खासगी वाहतूकदारांची मिळकत चांगली झाली आहे. एसटी संपाबाबत अनेक बैठका झाल्या, त्यानंतर जवळपास 14 दिवसांनी सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ जाहीर करण्यात आली, मात्र तरीही विलीनीकरणावर काही ठिकाणचे एसटी कर्मचारी ठाम असल्याने एसटी सुरू झालीच नाही. एसटीच्या संपाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवारही शेवटी मैदानात उतरले, मात्र काही ठिकाणी अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने अनेक ठिकाणी खासगी वाहतूक सुरू आहे.
कर्मचारी कामावर, खासगी वाहतुकीला दणका
पुण्यातले एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्याने लालपरी पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळेच एसटीने पत्रक काढत हा निर्णय जाहीर झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटीचे तिकीटदर खासगी वाहनांत्या तुलनेत कमी असल्याने एसटीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी सोयीचा ठरणार आहे.