सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये मराठी शिकवली का? शाळांना अहवाल सादर करण्याचे आदेश!

सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE), केंब्रिज (Cambridge), आयबी (IB) यांसारख्या मंडळांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यात आली का, याबाबत आता सखोल माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (State Council of Educational Research and Training) मागवली आहे.

सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये मराठी शिकवली का? शाळांना अहवाल सादर करण्याचे आदेश!
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 12:20 PM

पुणे : राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळात मराठी भाषा (Marathi Language) शिकवणे अनिवार्य करण्यात आली आहे. सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE), केंब्रिज (Cambridge), आयबी (IB) यांसारख्या मंडळांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मराठी शिकवणं शाळांना बंधनकारक आहे. त्याप्रमाणे या शाळांमध्ये खरंच विद्यार्थ्यांना खरंच मराठी भाषा शिकवण्यात आली का, याबाबत आता सखोल माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (State Council of Educational Research and Training) मागवली आहे. त्यानुसार या सर्व शाळांना वर्षभरात शिकवल्या गेलेल्या मराठीच्या तासांचा अहवाल राज्य परिषदेला द्यावा लागणार आहे. (Order to submit a report to the Department of Education on whether Marathi is taught in CBSE, ICSE schools)

31 ऑगस्टपर्यंत सादर करायचा अहवाल

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मराठी विषय अध्ययन, अध्यापनामध्ये सक्तीचा करण्यासाठी ‘मराठी भाषा अधिनियय 2020’ काढला. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज आणि आयबी बोर्डाच्या शाळांना मराठी शिकवल्याचा अहवाल 31 ऑगस्टपर्यंत राज्य परिषदेला सादर करावा लागणार आहे.

अहवालात काय असणार?

शाळांनी मराठी शिकवली आहे का आणि असल्यास त्याचं स्वरूप काय होतं याबाबतची माहिती शाळांना द्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये, शाळांमध्ये मराठी कधीपासून शिकवण्यात येते, किती विद्यार्थ्यांना मराठीचे कसे शिक्षण दिले जाते, त्यासाठी कोणत्या पाठ्यपुस्तकांचा आधार घेतला जातो, मराठी शिकवण्यासाठी शाळांमध्ये किती शिक्षक आहेत, त्यांना मराठी शिकवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे का, शाळांमध्ये किती विद्यार्थी मराठी शिकत आहे, त्यांची संख्या किती आहे, ते मराठीचा वापर करतात का यासोबतच मराठीचं शिक्षण देण्यासाठी नव्याने शिक्षकांची भरती करण्यात आली आहे का या प्रश्नांची माहिती शाळांनी अहवालामध्ये द्यायची आहे.

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जांची मुदत संपली

इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडण्याच्या पर्यायाची मुदत रविवारी रात्री संपली. पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी 75 हजार 749 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे तर जवळपास 58,768 विद्यार्थ्यांची प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 311 कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी केली. याद्वारे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेशासाठी एक लाख 11 हजार 205 जागा उपलब्ध झाल्या आहेत.

अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या 67 हजार 131 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक, तर 66 हजार 247 विद्यार्थ्यांचे अर्जांची पडताळणी झाली आहे. येत्या शुक्रवारी पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात येईल.

संबंधित बातम्या :

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची मुदत संपली, आता 27 ऑगस्टला मेरिट लिस्ट लागणार

पुणे विद्यापीठाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 12 जुलैपासून 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

मोठी बातमी, कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.