Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sant Tukaram Maharaj : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जून ते 24 जुलै दरम्यान पार पडणार ; पालखीसाठी बैलजोडी मालकांकडून अर्ज मागवले

जगद्‌गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी 337 व्या पायीवारी पालखी सोहळ्याच्या पालखी रथासाठी 2 बैल जोड्या तर चौघडा गाडीसाठी एक बैल जोडी निवडण्यात येणार आहे. यासाठे देवस्थान समितीकडून बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बुधवारी (दि.18) व गुरुवारी ( दि.19 ) असे दोन दिवसांमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत संस्थाच्या कार्यालयात हे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Sant Tukaram Maharaj : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जून ते 24 जुलै दरम्यान पार पडणार ; पालखीसाठी बैलजोडी मालकांकडून अर्ज मागवले
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 11:29 AM

देहू – कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून स्थागित असलेली आषाढीवारी (Ashadhiwari)यंदा मोठ्या उत्सहात संपन्न होणार आहे. कोरोना संकट आटोक्यात आल्याने राज्य सरकारने (State Government)पायी वारीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकर्‍यांमध्ये उत्साह आला आहे. तीर्थक्षेत्र देहू येथून जगद्‌गुरू श्री संत श्री तुकाराम महाराज (Sant Tukaram Palkhi))यांचा 337 वा पालखी सोहळाचे 20 जून रोजी प्रस्थान होणार आहे. पस्तीस दिवसांच्या प्रवासानंतर 24 जुलै रोजी देहूत पुनरागमनाने पालखी सोहळ्याचा समारोप होईल. पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. देवस्थान समितीकडून या पालखी सोहळ्यातील सुमारे दोन टन वजनाचे पालखी रथासाठी निरोगी, धष्टपुष्ट, टोकदार शिंगे, वशिंड ,पांढराशुभ्र देखण्या दोन बैलजोड्यांची तपासणी करून निवड करण्यात येणार आहे. तसेच पालखी सोहळ्यातील चौघडा गाडीसाठी एक बैलजोडीची निवड करण्यात येणार आहे. यासाठीचे प्रक्रिया सौर करण्यात आली आहे.

पालखी रथासाठी 2 बैल जोड्या तर चौघडा गाडीसाठी एक बैल जोडी

जगद्‌गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी 337 व्या पायीवारी पालखी सोहळ्याच्या पालखी रथासाठी 2 बैल जोड्या तर चौघडा गाडीसाठी एक बैल जोडी निवडण्यात येणार आहे. यासाठे देवस्थान समितीकडून बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बुधवारी (दि.18) व गुरुवारी ( दि.19 ) असे दोन दिवसांमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत संस्थाच्या कार्यालयात हे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समितीकडून निरोगी, धष्टपुष्ट, टोकदार शिंगे, वशिंड ,पांढराशुभ्र देखण्या दोन बैलजोड्यांची तपासणी करून निवड केली जाणार आहे.

कधी होणार प्रस्थान

येत्या 10 जुलैला पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी सोहळ्या संपन्न होणार आहे. यासाठी 20 जूनला देहूमधून संत तुकाराम महाराजांची व 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करणार आहेत. तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.

हे सुद्धा वाचा

तुकाराम महाराजांच्या पालखीतील रिंगण

पालखी प्रस्थान – 20 जून 2022

पहिलं गोल रिंगण – 30 जून 2022 (बेलवंडी)

दुसरं गोल रिंगण – 2 जुलै 2022 (इंदापूर)

तिसरं गोल रिंगण – 5 जुलै 2022 (अकलूज माने विद्यालय)

पहिलं उभं रिंगण – 6 जुलै 2022 (माळीनगर)

दुसरं उभं रिंगण – 8 जुलै 2022 (बाजीराव विहीर)

तिसरं उभं रिंगण – 9 जुलै 2022 (पादुका आरती)