Pandharpur Wari : यंदाची पालखी सोन्या आणि माऊली ही बैलजोडी घेऊन जाणार, कुणाच्या बैलांना मिळाला पालखीचा मान? वाचा
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैलजोडीची निवडही झाली आहे. फुरसूंगीच्या अप्पासाहेब खुटवड यांच्या कुटुंबाला यंदाच्या पालखीची मान मिळाला आहे. त्यामुळे त्यांची सोन्या आणि माऊली ही बैलजोडी पालखी घेऊन पंढरपुरात दाखल होणार आहे.
पुणे : यंदाच्या वारीची तयारी (Pandharpur Wari) जोमाने सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून पायी वारी (Pandharpur Vitthal) झाली नव्हती. कारण कोरोनाची दहशत दोन वर्षात जगाने पाहिली आहे. या कोरोनामुळे दोन वर्षे वारकऱ्यांना विठ्ठल जणू पोरकाच झाला होता. दोन वाऱ्या या बसनेच पार पडल्या. मात्र यंदा कोरोनाची (Corona Update) दहशत कमी झाल्यामुळे वारी ही पायी निघणार आहे. त्यासाठी आता जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैलजोडीची निवडही झाली आहे. फुरसूंगीच्या अप्पासाहेब खुटवड यांच्या कुटुंबाला यंदाच्या पालखीची मान मिळाला आहे. त्यामुळे त्यांची सोन्या आणि माऊली ही बैलजोडी पालखी घेऊन पंढरपुरात दाखल होणार आहे. पाच वर्षानंतर मान मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
बैलजोडीचा व्हिडिओ
तयारीला जोमाने सुरूवात
या बैलजोडीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात ही देखणी बैलजोरी बैलगाडी घेऊन धावताना दिसून येत आहे. या धिप्पाड बैलांना यांचे मालक त्यांच्याच शिवारात फिरवताना दिसून येत आहे. यावेळी बैलांच्या गळ्यातला घागर माळही खळखळून वाजतेय. हा आवाज बैलांनाही हुरूप भरवणारा आहे.
बैलांची मिरवणूक काढणार
2 तारखेला फुरसूंगीत या बैलाची मिरवणूक काढली जाणार आहे आणि मग बैलजोडी अर्पण केली जाणार आहे. त्यामुळे सध्या ही कुटुंब जोमाने तयारीला लागलं आहे. हा मान मिळावा अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असेत. पालखीची सेवा करण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील सर्वात मोठा क्षण मानला जातो. आता या कुटुंबाला यंदा ही संधी मिळाली आहे.
यंदा वाजत गाजत वारी निघणार
गेल्या दोन वर्षांपासून बसने निघणारी वारी यंदा पायी वाजत गाजत, टाळ मृदुंगाच्या गजरात निघणार आहे. वारीचे हे दिवस वारकऱ्यांसाठी सर्वात जास्त आनंददायी दिवसत असता. या वरीत सर्वजण गुण्यागोविंदाने पाऊली चालत पंढरपूर गाठतात. एकादिशीदिवशी विठुरायाच्या पायावर डोकं टेकवायला मिळावं यासाठी ही सर्व तयारी सुरू असते. यावेळी वारीसाठी असणाऱ्या बैलजोडीला पुणे ते पंढरपूर असा लांगपल्ल्याचा टप्पा गाठावा लागतो. त्यामुळे बैलांवरही तेवढाच ताण येतो. हा ताण सहज वाहून नेणारी बैलजोडी या वारीसाठी निवडली जाते. त्यासाठी बैलाचा सरावही घेतला जोता. या काळात बैलांच्या खुराकाचीही विशेष काळजी घेतली जाते. बैल आजारी पडून नये किंबा थकू नये याकडेही विशेष लक्ष दिले जाते. आता यंदा हीच जबाबदारी सोन्या आणि माऊली पार पाडणार आहे.