पॅराशूट फुटले अन् पुणे शहरात आकाशातून थेट जमिनीवर आले उपकरण, आता सुरु झाली चर्चा

Pune News : पुणे शहरात बुधवारी सकाळी आकाशातून एक उपकरण पडले. यामुळे नवीन चर्चा सुरु झाली आहे. हे उपकरण कोणाचे, ते शूत्र राष्ट्रांकडून हेरगिरीसाठी तर पाठवले गेले नाही ना? यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

पॅराशूट फुटले अन् पुणे शहरात आकाशातून थेट जमिनीवर आले उपकरण, आता सुरु झाली चर्चा
parachute
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 12:13 PM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील आकाशात बुधवारी एक पॅराशूट दिसले. हे पॅराशूट वेगाने जमिनीकडे येत होते. काही वेळेतच ते फुटले अन् त्यांच्यातून एक उपकरण खाली पडले. मग हे उपकरण काय आहे अन् ते पाठवले कोणी? यासंदर्भात चर्चा सुरु झालीय. हेरगिरीसाठी पाठवलेले उपकरण आहे की चुकून भरकटत आलेले हे पॅराशूट यावर गप्पा रंगल्या आहेत. यासंदर्भात जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान पोलिसांनी ते जप्त केली असून तपास सुरु केला आहे.

नेमके काय घडले

पुणे शहरातील आकाशातून अज्ञात वस्तू थेट जमिनीवर आली. यामुळे खळबळ उडाली आहे. ही वस्तू काय आहे? याचा अंदाज लावला जात आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील वाफगाव येथील एका शेतात उपकरण पडले. हे उपकरण पडताना अनेक जणांनी पाहिले. आधी आकाशातून पॅराशूट खाली येत असताना ते फुटले. त्यानंतर त्याच्यातून उपकरण पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. आकाशातून थेट जमिनीवर उपकरण पडत आल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले.

हे सुद्धा वाचा

काय पडले ते पाहण्यासाठी धावले

आकाशातून काही जमिनीवर आल्याचे शेतकऱ्यांना दिसले. मग हा काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी शेतकरी धावले. उपकरण आकाशातून थेट जमिनीवर आल्यानंतर त्याचे पॅराशुट फुटले होते. या उपकरणावर चीनी भाषेत लिहिले आढळून आले. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. हवामान विभागाचे सेटेलाईटच्या निरिक्षकाचे हे उपकरण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु हे उपकरण कसे आले?, पॅराशूट हेरगिरीसाठी सोडले होते का? पुणे शहरात अनेक संशोधन संस्था आहे, त्याची हेरगिरी करण्याचा प्रयत्न होता का? त्यात चीन भाषेत लिहिलेले असल्यामुळे ते चीन किंवा पाकिस्तानचे तर नाही ना? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरु झालीय.

दरम्यान सापडलेले हे उपकरण पोलिसांनी जप्त केले आहे. त्यासंदर्भात तपासानंतरची माहिती मिळणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

हनी ट्रॅपनंतर पुण्यात चर्चा

पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले. एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. हे प्रकरण सुरु असताना आकाशातून उपकरण पडले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कुरुलकर सध्या कारागृहात आहे. त्याची पॉलीग्राफी चाचणी करण्यात येणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.