Pune metro : नाशिक फाटा चौकाला भोसरीचं नाव का? Patit Pavan Sanghatana आक्रमक, आयुक्तांना दिलं पत्र
नाशिकफाटा (Nashik phata) येथील मेट्रो स्टेशनच्या भोसरी (Bhosari) स्टेशन या नावास पतित पावन संघटनेने विरोध केला आहे. या ठिकाणावरून भोसरी हे गाव जवळपास 4 किलोमीटर आहे, त्यामुळे ते नाव बदलावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) काही मार्गांवर मेट्रो सुरू झाली मात्र वाद काही थांबायला तयार नाही. आधी तर उद्धाटनावरून वाद सुरू होता. आता नवा वाद समोर आला आहे. नाशिकफाटा (Nashik phata) येथील मेट्रो स्टेशनच्या भोसरी (Bhosari) स्टेशन या नावास पतित पावन संघटनेने विरोध केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांसाठी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मात्र नाशिक फाटा चौकामधील मेट्रो स्टेशनला भोसरीचे नाव देण्यात आले आहे. ते बदलण्याची मागणी पतित पावन संघटनेने केली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील नाशिककडे जाण्यासाठी या ठिकाणाहून सुरूवात होते, म्हणून या चौकाला नाशिकफाटा चौक हे नामकरण जनतेकडून झालेले आहे. तसेच या ठिकाणावरून भोसरी हे गाव जवळपास 4 किलोमीटर आहे, त्यामुळे ते नाव बदलावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आयुक्तांना पत्र
पतित पावन संघटनेने यासंबंधी पतित पावन संघटनेने पिंपरी चिंचवड आयुक्तांना पत्रव्यवहारदेखील केला आहे. त्यात असे म्हटले आहे, की वार रविवार दिनांक 06/03/2022 रोजी मेट्रो रेल सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. परंतू नाशिक फाटा चौकामधील मेट्रो स्टेशनला भोसरीचे नाव देण्यात आले आहे. सदर नाव देण्यामागे नेमका कसा निर्णय घेण्यात आला आहे, असा लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील नाशिककडे जाण्यासाठी या ठिकाणाहून सुरूवात होते, म्हणून या चौकाला नाशिकफाटा चौक हे नामकरण जनतेकडून झालेले आहे. तसेच या ठिकाणावरून भोसरी हे गाव जवळपास 4 किमीचे आसपास असताना आपण काय म्हणून या स्टेशनला भोसरीचे नाव दिले आहे? हे एकत्र आपण जाहीररीत्या प्रकट करावे अन्यथा या मेट्रो स्टेशनचे भोसरी हे नाव त्वरीत बदलून नाशिकफाटा मेट्रो स्टेशन अथवा उड्डाणपुलाला असलेले नाव जमशेदजी टाटा मेट्रो स्टेशन असे नाव आपण या मेट्रो स्टेशनला द्यावे, अशी आपणास मागणी करण्यात येत आहे. आपणाकडून त्वरीत अंमलबजावणी होईल, ही अपेक्षा.