Pune News: पिंपरी चिंचवडमध्ये 1 जुलैपासून ‘पे अँड पार्क’

Parking | 450 पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. शहरातील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Pune News: पिंपरी चिंचवडमध्ये 1 जुलैपासून ‘पे अँड पार्क’
पार्किंगची सुविधा
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 10:49 AM

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 1 जुलैपासून 450 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा सुरु होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल.यामध्ये 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकूण 450 पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. शहरातील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. (Parking for vehicles in Pimpri Chinchwad)

1 जुलैपासून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 40 रुपयांनी घटणार

रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होत असल्यामुळे रेल्वे (Railway) प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात 50 रुपयांवर गेलेल्या प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा 10 रुपयांपर्यंत खाली येतील. 1 जुलैपासून या नियमाची अंमलबजावणी होईल.

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज स्थानकांवर गेल्यावर्षी मार्चपासून प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये केली होती. तसेच हे तिकिट सरसकट न देता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना सोडण्यास नागरिकांनाच दिले जात होते. मात्र, आता रेल्वे वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागली आहे, त्यामुळे चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 10 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मनोझ झंवर यांनी दिली.

पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

पुणे महापालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या 23 गावांबाबत राज्य सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतलाय. तशी माहिती शिवसेनेचे नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलीय. पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या 23 गावातील शाळा, जमिनी, अंगणवाड्या या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागांना मंजुरी दिल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे

संबंधित बातम्या:

‘रक्त सांडलं तरी जमिनी देणार नाही’, पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

‘आतापर्यंत कुठल्याच झोपडपट्टीवर अशी कारवाई नाही’, निलम गोऱ्हे आंबील ओढ्याप्रकरणी आक्रमक

मोठी बातमी: ऑनलाईन शिक्षण महागलं; बालभारतीच्या अ‍ॅप्लिकेशनसाठी आता पैसे मोजावे लागणार

(Parking for vehicles in Pimpri Chinchwad)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.