पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांना रुखरुख लावली, भाजपचे एकमेव शिलेदार प्रदीप कंद फडणवीसांच्या भेटीला

प्रदीप कंद यांच्या पराभवासाठी अजित पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रचार सभेत अजित पवारांनी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं.

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अजितदादांना रुखरुख लावली, भाजपचे एकमेव शिलेदार प्रदीप कंद फडणवीसांच्या भेटीला
प्रदीप कंद यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 9:02 AM

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co Operative Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने विजय मिळवला असला, तरी एका निकालाने त्यांना रुखरुख लागली. ती जागा म्हणजे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार प्रदीप कंद (Pradeep Kand) यांची. विजयानंतर प्रदीप कंद यांनी विरोधीपक्ष नेते आणि भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

फडणवीसांच्या भेटीवेळी प्रदीप कंद यांच्यासोबत भाजप आमदार राहुल कुलही उपस्थित होते. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांचा पराभव केला होता. सुरेश घुले यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला. मात्र, प्रदीप कंद यांच्या पराभवासाठी अजित पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. प्रचार सभेत अजित पवारांनी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली. त्यामुळे कंद यांचा विजय भाजपसाठी महत्त्वाचा होता.

अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी?

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 15 जानेवारीला होणार आहे. निवडीसाठी जिल्हा बॅंकेच्या नवीन संचालक मंडळाची पहिली सभा दुपारी एक वाजता होणार आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या 21 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादीचे बॅंकेवर एकहाती वर्चस्व आहे. या 16 जणांना एका अपक्षाची साथ मिळणार आहे. अध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

कोणी कुठली जागा जिंकली?

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला.

कोणाकोणाची बिनविरोध निवड

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne), इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

विजयाचा गुलाल, राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने

निवडणुकीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धावतच रस्त्यावर गुलाल उधळून आनंदाला वाट मोकळी करून दिली. ढोलताशे वाजवत या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

 

संबंधित बातम्या :

अजितदादांनी ज्या प्रदीप कंद यांना ‘जागा दाखवण्यासाठी’ दंड थोपटले, त्यांनीच निवडणुकीत ‘जागा’ जिंकली

पुणे जिल्हा बँक अजितदादांच्या खिशात, एक जागा गमावली, कारण बारामतीतच 52 मतं फुटली

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.