Photos : पुण्यात भाजप आमदाराचा झुंबा डान्स, सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी झुंबा डान्स करत उपस्थितांची मनं जिंकली. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्ज उडालेला दिसला.
Follow us
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी झुंबा डान्स करत उपस्थितांची मनं जिंकली.
मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्ज उडालेला दिसला.
पिंपरी चिंचवड महापालिका, सायकल मित्र, अविरत श्रमदान आणि महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रिव्हर सायक्लोथॉन 2021 सायकल स्पर्धेत त्यांनी हा डान्स केला.
इंद्रायणी नदीचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यासाठी सायक्लोथॉन स्पर्धा भरविण्यात आली होती. तेव्हा मनोरंजनासाठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार लांडगे स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकले नाहीत, मग त्यांनीही ठेका धरला आणि उपस्थितांची मनं जिंकली.
आमदार महेश लांडगे प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असतात. इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षण आणि तरुणांना व्यायामाचे, सायकल चालवण्याचे महत्व पटावे यासाठी या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात आमदार लांडगे यांनी तरुणाईचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार महेश लांडगेंनी ‘तुझको मिरची लगी तो मै क्या करू’ या गाण्यावर नृत्य केले.
आमदार महेश लांडगे यांच्या चाहत्यांनी यावर टाळ्या, शिट्ट्यांनी चांगलीच दादही दिली.
मात्र, कोरोनाची पार्शवभूमी असतानाही या कार्यक्रमाला झालेली गर्दी, सोशल डिस्टनसिंगचा फज्जा, मास्क न वापरतात सहभागी झालेले स्पर्धक आणि स्वतः आमदार महेश लांडगे यांचंही बेफिकीर वागणं यामुळे कार्यक्रमाला काहीसं गालबोटही लागलं.
त्यामुळे हा कार्यक्रम जसा त्यांच्या डान्समुळे चर्चेत आला, तसाच तो येथील गर्दीमुळेही चर्चेत आला.