घृणास्पद! पुण्यात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम फरार

पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टेशनजवळील शौचालयात हा प्रकार झाला आहे.

घृणास्पद! पुण्यात सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम फरार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार (प्रतिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 11:57 AM

पुणे : पुण्यात 12 वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात (Public toilet) बलात्कार (Physical abuse) करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bund garden police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे स्टेशनजवळील शौचालयात हा प्रकार झाला आहे. दरम्यान, नराधम आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळच्या जनसेवा सार्वजनिक स्वच्छतागृहात हा संतापजनक प्रकार घडला आहे. यानंतर आरोपी पळून गेला. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा संताप सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशाप्रकारची कृत्ये करणाऱ्यांना तातडीने कठोर शिक्षेची तरतूद असायला हवी, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत.

काय नेमकी घटना?

पीडित अल्पवयीन मुलगी पुणे स्टेशनजवळील जनसेवा शौचालयमधील महिलांच्या स्वच्छतागृहात गेली. मुलगी अल्पवयीन असल्याचे पाहून आरोपीने पाठलाग केला आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपीचे वय अंदाजे 35 असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोप अद्याप फरार आहे.

अलिकडील काही संतापजनक घटना

येरवड्यात एका मुलीवर येथील शाळेत शिरून एकतर्फी प्रेमातून दहावीतील मुलीवर खुनी हल्ला झाला होता. त्यानंतर पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत एका अनोळखी व्यक्तीने 11 वर्षीय मुलीवर शाळेच्या स्वच्छ्तागृहात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला धमकीही दिली होती.

आणखी वाचा :

Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक

Pune crime : एस्कॉर्ट सर्व्हिस रोलच्या बहाण्यानं तरुणाची 17.26 लाख रुपयांची फसवणूक

दिघीत सापडले तब्बल 12 डुक्कर बॉम्ब! दोन महिन्यापूर्वी बालिकेचा झाला होता मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.