घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना सुविधा सुरु, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले परवाने

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यलयातून एकूण 225 जणांनी घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवानाचा लाभ घेतला आहे. learning License from home

घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवाना सुविधा सुरु, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयातून 225 जणांना मिळाले परवाने
पिंपरी चिंचवड आरटीओ
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 8:23 PM

पुणे: पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यलयातून एकूण 225 जणांनी घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ वाहन परवानाचा लाभ घेतला आहे. यामुळे नागरिकांच्या आरटीओ मधील चकरा वाचल्या असून तसेच श्रम,वेळ व पैशाची देखील बचत होणार आहे. राज्यभरात या उपक्रमाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड वेबसाईटवर अपलोड करावे लागत आहे. (Pimpari Chinchwad RTO department 225 people taking learning License from home via online mode)

15 गुणांची परीक्षा

एका परवान्यासाठी दोनशे रुपये शुल्क आहे त्याचबरोबर 15 गुणांची परीक्षाही द्यावी लागत आहे. यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक ला लिंक असणे गरजेचे आहे व पत्त्याचा पुरावा व ओळखपत्र अत्यावश्यक आहे. तर, वयोमर्यादा ही 18 वर्षाची आहे. सर्वात सोप्या पद्धतीने हे लायसन्स उपलब्ध होत आहे. ऑनलाइन नमुना चाचणी सराव देखील यामध्ये देण्यात आलेला आहे.

आरटीओ कार्यालयाप्रमाणे ऑनलाईन परवान्यांसाठी कुठलेही बंधन राहणार नाही. अपॉइंटमेंटची देखील आवश्यकता नसल्यामुळे नागरिक आपल्या वेळेप्रमाणे कधीही या सेवेचा घरबसल्या लाभ घेऊ शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही चांगली सुविधा असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले आहे.

खर्चात बचत, कामाचा ताणही कमी

राज्यात दरवर्षी सुमारे 15 लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात. तसंच 20 लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. याकामी नागरिकांचा अंदाजे 100 कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत होऊन नागरिकांचा वेळ आणि श्रमही वाचणार आहे. तसंच हे काम करणाऱ्या अंदाजे 200 अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

परिवहन सेवेतील हे क्रांतीकारी पाऊल- अनिल परब

जनहिताच्या दोन ऑनलाईन सेवांचे लोकार्पण हे या क्षेत्रातील क्रांतीकारी पाऊल असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. आजच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गर्दी टाळून विभागाचे नियमित कामकाज सुरु ठेवण्यासाठीही त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. विभागामार्फत आतापर्यंत जनहिताच्या 85 सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी परब यांनी दिली.

संबंधित बातम्या:

लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा, योजनेचं उद्घाटन, अनिल परबांची घोषणा

नागरिकांना सुविधा देण्यासाठी ई-गव्हर्नन्स आधारित कार्यपद्धती वापरावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

(Pimpari Chinchwad RTO department 225 people taking learning License from home via online mode)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.