पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध शिथील, हॉटेल्स रात्री 10 पर्यंत, कोणकोणते नवे बदल?

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार शहरात आता सर्व दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना निर्बंध शिथील, हॉटेल्स रात्री 10 पर्यंत, कोणकोणते नवे बदल?
पिंपरी चिंचवड महापालिका
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 1:23 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad) कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातही 30 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरळीत सुरुवात झाली आहे. (Pimpri Chinchwad Corona Guidelines relaxed after COVID case decreases)

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार शहरात आता सर्व दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर हॉटेल्स आणि बार रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे.

30 ते 44 वर्ष वयोगटातील लसीकरणाला सुरुवात

दुसरीकडे, पिंपरी चिंचवड शहरातही 30 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. शहरातील 36 केंद्रांवर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर 200 डोस उपलब्ध असणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात गेले काही दिवस लसीकरणामध्ये मोठा गोंधळ होत होता, मात्र ॲपवर नोंदणी असल्यामुळे लसीकरण केंद्रावर ज्यांची नावे आहेत, तेच नागरिक येत आहेत. त्यामुळे लसीकरण सुरळीत असल्याचं चित्र चिंचवडमध्ये पाहायला मिळालं.

पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद

लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर मागील रविवारी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. प्रत्यक्षात मात्र पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड किल्ला आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत.

पाचशे रुपये दंड आणि गुन्हाही दाखल

अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. फिरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पाचशे रुपये दंड तर करण्यात येत आहेच, शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 188 नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केलं आहे.

भुशी डॅमवरही गर्दी

दरम्यान, लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण परिसरात रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर बंदी आहे. तरी सुद्धा नागरिक बेफिकीरपणे लोणावळा शहरात प्रवेश करत आहेत. त्याच पर्यटकांवर आता लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या :

सिंहगड, खडकवासला धरणावर जाताय? गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर दंडासह गुन्हाही दाखल

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार

(Pimpri Chinchwad Corona Guidelines relaxed after COVID case decreases)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.