Pimpri Chinchwad crime| पिंपरी – चिंचवडमध्ये रुजू पाहणाऱ्या वेश्या व्यवसायाची पाळंमुळं सातासमुद्रा पल्याडची

शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली आहे तर दलाल तसेच मुख्य सुत्रधारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील काही लाॅज, तसेच स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे वर्षभरातील कारवाईवरून समोर आले

Pimpri Chinchwad crime|  पिंपरी - चिंचवडमध्ये रुजू पाहणाऱ्या वेश्या व्यवसायाची पाळंमुळं सातासमुद्रा पल्याडची
Pimpri Chinchwad policeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 8:00 AM

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी खूपवेळा स्पा सेंटरचा (spa- center ) नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अनेकदा आरोपीच्या मुसक्या आवळत, तरुणीची सुटकाही केली आहे. मात्र तरीही शहरात पुन्हा वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या व्यवसायाची परदेशातं रुजलेली पाळंमुळं होय. गतवर्षात पिंपरी पोलिसांनी(Pimpri Chinchwad police)  तब्बल या व्यवसायात अडकलेल्या तब्बल 22 परदेशी पीडित तरुणीची सुटका केली आहे. त्यामुळे या महिलांना शहरात नेमकं कोण आणत असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अवैध धंद्यांवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली आहे तर दलाल तसेच मुख्य सुत्रधारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील काही लाॅज, तसेच स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे वर्षभरातील कारवाईवरून समोर आले. वेश्याव्यवसायासाठी काही परदेशी महिलांना प्रवृत्त केल्याचेही यातून समोर आले. पोलिसांनी अशा महिलांची सुटका केली. कायदेशीर कार्यवाही करून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले.

 या देशातील महिलांचा समावेश

शहरात पोलिसांनी विविध परिसरात केलेल्या वेश्या व्यवसायावरील कारवाईत युगांडा या देशातील १४ महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. तसेच बांग्लादेशातील सात, केनियातील एक पीडित महिलेची देखील सुटका केली. यातील दोन बांग्लादेशी महिलांकडे कागदपत्रे मिळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आले. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत परदेशी नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. यातील काही परदेशी महिला वेश्याव्यवसायात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवईवरून समोर आले आहे. भाडेतत्त्वार घेतलेल्या घरात परदेशी नागरक वास्तव्य करतात. यातील काही परदेशी तरुणी वेश्याव्यवसायात ओढल्या जातात.

भाषेमुळे समुपदेशनास येतोय अडथळा

वेश्याव्यवसायातून सुटका केलेल्या परदेशी महिलांना समुदपेदशन केंद्रात ठेवण्यात येते. तेथे मराठी, हिंदी, इंग्रजीतून देखील समुपदेशन केले जाते. मात्र बहुतांश पीडित परदेशी महिलांना या भाषा अवगत नसतात. त्यांना केवळ त्यांच्या देशातील त्यांची बोलीभाषा समजते. त्यामुळे समुपदेनात अडचणी येतात.  वेश्याव्यवसायात दलालांची मोठी साखळी असल्याचे यावरून दिसून येते. यात स्थानिक तसेच परदेशातील काही व्यक्तींचाही समावेश असू शकतो. वेश्याव्यवसायाची पाळेमुळे खोदून या दलालांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Noida : आधी पत्नीचा गळा आवळला, मग आत्महत्या दर्शवण्यासाठी पंख्याला लटकवले, नोएडात दारुच्या नशेत पतीकडून महिलेची हत्या

Supreme Court : निवडणुकांआधी ‘मोफत’ची आश्वासने देणे हा एक गंभीर मुद्दा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! एखाद्या कार्यालयात जाऊन कागदपत्रे पाहता येतात का? तज्ज्ञ काय सांगतात?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.