अनाथ, निराधार मुलांना पहिली ते पदवीपर्यंत शिष्यवृत्ती, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतर कल्याणकारी योजनांचा एक भाग म्हणून अनाथ किंवा निराधार मुलांना पहिलीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे निराधार मुलांना शिक्षणासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मदत होऊ शकेल.

अनाथ, निराधार मुलांना पहिली ते पदवीपर्यंत शिष्यवृत्ती, पिंपरी चिंचवड महापालिकेची योजना, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 3:50 PM

पिंपरी-चिंचवड : केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगी अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. यासोबतच वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबवत असतात. (Pimpri Chinchwad Municipal Corporation conducts scholarship scheme for orphans and destitute children)

पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आपल्या हद्दीतल्या नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये विद्यार्थी, दिव्यांग, महिला, मुली, मागासवर्गीय, एचआयव्हीबाधित, कुष्ठपिडित आदींसाठी शिक्षण, घर, शस्त्रक्रिया, पुनर्वसन आणि इतर बाबींसाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहय्य केलं जातं. अशा विविध योजनांची आपण ओळख करून घेणार आहोत.

इतर कल्याणकारी योजना

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. यापैकी इतर कल्याणकारी योजनांचा एक भाग म्हणून अनाथ किंवा निराधार मुलांना पहिलीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे निराधार मुलांना शिक्षणासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मदत होऊ शकेल.

कसा करायचा अर्ज?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बालकाचं किंवा विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव, बालक अनाथआश्रमात राहत असल्यास त्या संस्थेचं नाव, पत्ता किंवा पालकत्व घेतलेल्या व्यक्तीचा नाव आणि पत्ता अर्जामध्ये भरून द्यायचा आहे. सोबतच शैक्षणिक माहिती, इयत्ता, शाळा-महाविद्यालयाचे नाव, जातीचा दाखला, आणि शिष्यवृत्तीसाठी बँक खात्याचा तपशिल अर्जासोबत द्यायचा आहे.

ही शिष्यवृतीत मिळवण्यासाठी पालकत्व स्वीकारलेल्या संस्था किंवा व्यक्तीने एक स्वयंघोषणापत्र लिहून द्यायचं आहे. या घोषणापत्रात सर्व खरी माहिती नमूद केल्याबाबत माहिती द्यायची आहे. तर मिळणारी सर्व शिष्यवृत्ती ही लाभार्थी विद्यार्थ्यावर खर्च करण्यासंदर्भात लेखी आश्वासन द्यायचं आहे. यासोबत अर्जदार विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा-महाविद्यालयाचं एक शिफारसपत्रंही आवश्यक आहे. त्याचा नमुना अर्जासोबत दिलेला आहे.

कोणती कागदपत्रं लागणार?

अर्जदार बालक हा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतला रहिवाशी असावा ही या योजनेची अट आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत राहत असल्याचा पुरावा म्हणून आधारकार्डाची प्रत जोडायची आहे. यासोबत मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादी या दोन्हीपैकी एक पुरावा जोडायचा आहे. अर्जदाराचं मतदान ओळखपत्र नसल्याचं पालकांचं मतदान ओळखपत्र जोडावं.

विद्यार्थी एखाद्या संस्थेत राहत असल्यास त्या संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. अर्जदार अनाथाश्रमात राहत नसल्यास आई-वडिल हयात नसल्याचं प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे. यासोबत शैक्षणिक कागदपत्रं आणि गेल्यावर्षी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र अर्जासोबत द्यायचं आहे.

कुठे करणार अर्ज?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, नागरवस्ती विकास योजना, महापालिका, पिंपरी चिंचवड यांच्याकडे लेखी अर्ज करायचा आहे. या अर्जाचा नमुना महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in या अधिकृत वेबसाईट किंवा महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या कार्यालयात भेट द्या.

इतर बातम्या :

ॲमिनिटी स्पेसवरुन राजकारण तापणार, भाजपनं प्रस्ताव मंजूर केल्यास काय? राष्ट्रवादीचं ठरलं

‘हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं आंदोलन नाही’, दहीहंडी उत्सवावरुन मुख्यमंत्र्यांचा मनसे, भाजपला टोला

भाजपची जनआशीर्वाद यात्रा चालली, पण सण नाही चालणार?, Raj Thackeray यांचा सवाल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.