Pune crime : दबा धरून बसलेल्या नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दोघांना अटक
आरोपी लक्ष्मण याने या मुलीस उचलून नेऊन त्याचा मित्र रोहित याच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यावेळी 'मी तुझ्यासोबत जे केले ते कुणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन' अशी धमकी दिली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनाकडून लैंगिक अत्याचार (Physical abuse) करण्यात आल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. लक्ष्मण क्षीरसागर आणि रोहित सुतार अशी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी पिठाचा डब्बा आपल्या नातेवाईकांच्या घरी देण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपी नराधम लक्ष्मण क्षीरसागर याने पीडित अल्पवयीन मुलीला (Minor girl) उचलून नेऊन दुसरा आरोपी रोहित सुतार याच्या रूमवर घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कुठे वाच्यता केली तर पीडितेसह तिच्या घरच्यांना ठार करण्याची धमकीही दिली. यावेळी आरोपीचा साथीदार रोहित सुतार यानेही या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.
मारून टाकण्याची दिली धमकी
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की चिंचवड याठिकाणी यातील फिर्यादी असणाऱ्यांची जाऊ राहते. घरी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी (वय 12) पीठाचा डब्बा द्यायला गेली होती. त्याच परिसरात आरोपी लक्ष्मण याने या मुलीस उचलून नेऊन त्याचा मित्र रोहित याच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यावेळी ‘मी तुझ्यासोबत जे केले ते कुणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली. याचवेळी दुसरा आरोपी रोहित यानेदेखील तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
याप्रकरणी आरोपी लक्ष्मण संजय क्षीरसागर (वय 18, रा. मोरया हौसिंग सोसायटी, वेताळनगर, चिंचवड) आणि रोहित रमेश सुतार (वय 21, रा. तुकाराम नगर, वाल्हेकरवाडी, पुणे) या दोघांना अटक केली आहे. भा. दं. वि. कलम 354 (अ), 376, 376 (ड)(अ), 506, 34 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012चे कलम तीनसह 4, 7, 8 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.