Dream 11 मधून करोडपती बनलेल्या PSI ला पुणे पोलिसांचा धक्का

Dream 11 | पुण्याच्या PSI वर कुठल्या आरोपातंर्गत कारवाई झाली? कुठल्या मॅचमुळे हा पोलीस उपनिरीक्षक करोडपती झाला? सध्या वनडे वर्ल्ड कप सुरु आहे, त्यामुळे ड्रीम इलेव्हन खेळणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

Dream 11 मधून करोडपती बनलेल्या PSI ला पुणे पोलिसांचा धक्का
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 2:29 PM

पुणे : सध्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धा सुरु आहे. सर्वत्र क्रिकेटचा फिव्हर दिसून येतोय. टीम इंडियाच्या प्रत्येक सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुक्ता आहे. कोण जिंकणार?, कोण हरणार? या बरोबरच ऑनलाइन गेमिंग ड्रीम इलेव्हनच सुद्धा अनेकांना वेड लागलय. अनेकजण ड्रीम इलेव्हन सिलेक्ट करतात. तुम्ही निवडलेली टीम अचूक असेल, तर पैसा मिळतो. एकप्रकारचा हा ऑनलाइन जुगार आहे. पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक असलेले सोमनाथ झेंडे हे सुद्धा ड्रीम इलेव्हनचा जुगार खेळले. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी त्यांनी ड्रीम इलेव्हन निवडली. त्यातून सोमनाथ झेंडे यांना तब्बल दीड कोटी रुपये मिळाले. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना दीड कोटी रुपये मिळाल्याच जाहीर होताच त्यांच्या अडचणी वाढल्या. त्यांची चौकशी झाली.

सोमनाथ झेंडे यांच्यावर अखेर कारवाई झाली आहे. गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. परवानगीशिवाय ऑनलाइन गेम खेळला. गणवेशात मीडियाला मुलाखत देऊन पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली असा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोमनाथ झेंडे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात तैनात होते. सोमनाथ झेंडे सारखे कोट्यवधी लोक दररोज ड्रीम इलेव्हनमध्ये खेळतात. पैसा आल्यामुळे त्यांचं कुटुंब आनंदात होतं. पण हा आनंद औट घटकेचा ठरला. सोमनाथ झेंडे निलंबित असले, तरी विभागीय चौकशीत त्यांना स्वतःची बाजू मांडता येईल.

….म्हणून खेळणाऱ्यांची संख्या देखील मोठी

सध्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिऑया जबरदस्त खेळत आहे. सलग तीन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सारख्या बलाढ्य टीम विरोधात टीम इंडियाने विजय मिळवलाय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात ड्रीम इलेव्हन खेळण्याच प्रमाण अधिक वाढणार आहे. हा एकप्रकारचा ऑनलाइन जुगार आहे. पण त्यातून पैसे मिळत असल्याने तो खेळणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.